भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उद्या आमदार किशोर जोरगेवार दाखल करणार नामांकन अर्ज दुपारी १२ वाजता निघणार रॅली.

0
15

================================

दुपारी १२ वाजता निघणार रॅली.

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. उद्या ते भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेना. सुधीर मुनगंटीवारआणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची प्रमुखतेने उपस्थिती राहणार आहे.                                                                  आमदार किशोर जोरगेवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना भाजप तर्फे महायुतीची उमेदवारी देण्यात आली असून आता ते भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणुकीला समोर जाणार आहेत. “जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेचआता भाजपची साथ मिळाल्याने चंद्रपूरातील विकासकामे आणखी गतीशील करण्यात मदत होईल,” असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी म्हटले आहे. ===============================           उद्या सोमवारी दुपारी १२ वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या गांधी चौक येथील कार्यालयाजवळून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार नामांकन अर्ज दाखल करतील. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेअसे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.    ===============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   =============================                    कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे

*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here