Home
Home चंद्रपूर पोंभुर्णा तालुक्याचे भविष्य घडविण्याचा संकल्प – ना. सुधीर मुनगंटीवार  विकासाच्या बाबतीत पोंभुर्णा...

पोंभुर्णा तालुक्याचे भविष्य घडविण्याचा संकल्प – ना. सुधीर मुनगंटीवार  विकासाच्या बाबतीत पोंभुर्णा पुण्याच्याही पुढे राहील डोंगरहळदी (तुकूम) येथील नागरिकांशी साधला संवाद

0
84

================================

पोंभुर्णा तालुक्याचे भविष्य घडविण्याचा संकल्प – ना. सुधीर मुनगंटीवार 
विकासाच्या बाबतीत पोंभुर्णा पुण्याच्याही पुढे राहील
डोंगरहळदी (तुकूम) येथील नागरिकांशी साधला संवाद

पोंभुर्णा, दि. 8 : पोंभुर्णा तालुक्यात विकासाची दीर्घ मालिका तयार केली आहे. पोंभुर्णा विकासाच्या बाबतीत अग्रेसर राहावा यासाठी आरोग्य, शिक्षण, शेती, सिंचन, रोजगार स्वयंरोजगार या महत्त्वपूर्ण विषयावर भर देण्यात येत आहे, असे सांगत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा तालुक्याचे भविष्य घडविण्याचा संकल्प केला असल्याचा विश्वास नागरिकांना दिला.                                  पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी (तुकूम) येथे नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. ‘आरोग्य क्षेत्रात उत्तम रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, रस्ते, शाळा, आय.एस.ओ. प्रमाणित अंगणवाडी, तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय केलेत. तसेच डोंगरहळदी गावात अनेक विकासात्मक कामे करण्यात आली असून गाव विकासासाठी निधी कमी पडू दिला नाही. जात-पात, धर्म न पाहता या मतदारसंघाचे नावलौकिक वाढावा या दृष्टीने कामे केली आहे,’ असंही ते म्हणाले.                                                                        ‘पोंभुर्णामध्ये लक्ष्मी मित्तल ग्रुपचा उद्योग उभा राहत आहे. या ठिकाणी पोंभुर्णा तालुक्यातील 20 हजार तरुणांना थेट रोजगार तर 80 हजार तरुणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हजार रुपये धानाचा बोनस देण्याचे काम महायुती सरकारने केले असून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र व राज्य शासनाचे मिळून 12 हजार देण्यात येत होते. आता त्यात वाढ करून 15 हजार देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. जात, धर्म न पाहता मतदार संघात विकासाची कामे पूर्णत्वास नेली,’ याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.सुधीर मुंगटीवार यांनी गरीबां साठी आवास योजनेचे अनुदान सुद्धा वाढवीले आणि बचत गट ला 25 लक्ष रूपयंच निधि सुद्धा उपलब्ध करुण दिला,                  ==============================         *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*        ===============================                कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे

*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here