आमदार किशोर जोरगेवार यांनी विकासासंदर्भात केलेल्या सर्व मागण्या पूर्ण होतील – ना. देवेंद्र फडणवीस

0
14

=================================

आमदार किशोर जोरगेवार यांनी विकासासंदर्भात केलेल्या सर्व मागण्या पूर्ण होतील – ना. देवेंद्र फडणवीस

कोहिनूर तलाव मैदानात जाहीर सभा संपन्न, नागरिकांची तुफान गर्दी.

कार्यसम्राट आमदार किशोर जोरगेवार यांनी विकासाची कास धरून राजकारण केले. त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील काम वाखण्याजोगे असून अधिवेशनात त्यांनी वाघासारखी भूमिका मांडून चंद्रपूर मतदारसंघातील प्रश्न सोडवून घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास चंद्रपूरात स्पष्टपणे दिसत असून, आमदार किशोर जोरगेवार यांनी विकासासंदर्भात केलेल्या सर्व मागण्या सरकारमध्ये पूर्ण होतील, असे प्रतिपादन भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ============================          महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ कोहिनूर तलाव येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य सभेला संबोधित करताना फडणवीस बोलत होते. यावेळी उमेदवार आमदार किशोर जोरगेवार, मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, अनु. जमातीचे चेअर मॅन फग्गनसिंग फुलस्ते, श्रीनिवासजी गोमासे, नागेशजी मोडाम, विधानसभेचे संयोजन प्रमोदजी कडू, , ज्येष्ठ नेते विजय राऊत, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोकजी जीवतोडे, सर्व भाजपचे पद अधिकारी यांची उपस्थिती होती.  =============================            यावेळी पूढे बोलतांना ना. फडणवीस म्हणले कि, आमदार किशोर यांनी विकासकामांना मानवीय चेहरा दिला.अम्मा का टिफिन उपक्रमातून ते गरजवतांच्या जेवणाची सोय करत आहे. आम्ही नागपूरच्या दिक्षाभुमी विकासासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. तेव्हा चंद्रपूरच्या दिक्षाभुमीलाही निधी हवा यासाठी आग्रही जिद्द करुन त्यांनी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळवून घेतली. यातील पहिला टप्पा सरकारच्या वतीने देण्यात आला आहे. चंद्रपूरची आराध्य देवी माता महाकाली मंदिर परिसराच्या विकासासाठी त्यांनी 240 कोटी रुपयांचा निधी सरकारकडून मिळविला पूढल्या वर्षी होणार असलेल्या माता महाकाली महोत्सामध्ये या परिसराचा चेहरा बदलेला असेल होणार असलेली ही सर्व विकासकामे आमदार किशोर जोरगेवार यांच्या सततच्या पाठपूराव्यामुळेच शक्य झाली असल्याचे ते यावेळी म्हणाले.   ============================        शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी भाव मिळाल्यास त्यांच्यासाठी आर्थिक सुरक्षेचे जाळे उभारण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना, विशेषतः कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तसेच कृषी पंपांसाठी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येत असून, त्यासाठी 12 तासांचा स्थिर पुरवठा सुनिश्चित केला जाईल. हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.                                  त्यांनी राज्य परिवहन (एसटी) बसमधील महिला प्रवाशांसाठी 50% भाडे सवलतीचा उल्लेख केला. ही योजना लागू झाल्यामुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली असून, तोट्यातील राज्य परिवहन महामंडळ आता नफ्यात आले आहे. ‘लाडकी बहिण योजना’ अंतर्गत सरकार लाभार्थ्यांच्या खात्यात मासिक 1,500 रुपये जमा करत आहे, आणि या पुढे हे आर्थिक सहाय्य वाढवून 2,100 रुपये केले जाईल, असे फडणवीस यांनी जाहीर केलें,                                                मागील पाच वर्षांत चंद्रपूर मतदारसंघाचा सर्वसमावेशक विकास करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अपक्ष आमदार असूनही मोठा निधी या मतदारसंघात आणला आहे. यामध्ये बाबूपेठ उड्डाणपूल, रस्ते, अभ्यासिका, समाज भवन यांसारखी अनेक कामे पूर्ण केली आहेत, आणखी अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. आता माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आणि भाजपची साथ आहे. त्यामुळे चंद्रपूरातील विकास पर्वाला आणखी गती मिळेल, असे जोरगेवार म्हणाले.                                                              ==============================           जोरगेवार पुढे म्हणाले की, चंद्रपूरच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. चंद्रपूरातील प्रदूषण आणि पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन देत, फडणवीस यांचा पुढाकार या कामांसाठी असे ते म्हणाले.    =================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*         ==============================                  कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे

*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here