गोरगरीब जनतेच्या आणि लाडक्या बहिणींच्या आशिर्वादामुळेच माझा विजय ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता

0
5

===============================

चंद्रपूर     

आज बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मला जनतेने निवडून दिले आहे. माझा या मतदारसंघातील हा सलग चौथा विजय आहे. एखाद्या मतदारसंघातील लोक वारंवार तुमच्यावर विश्वास दाखवतात तेव्हा ती निवडणूकही जनतेची असते आणि विजय देखील जनतेचाच असतो. या प्रेमासाठी मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आणि लाडक्या बहिणींच्या कायम ऋणात राहील, या शब्दांत राज्याचे वने व सांस्कृतीक कार्य आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बल्लारपूर मतदार संघाचे विजयी उमेदवार ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
============================
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या विजयाचे श्रेय सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला दिले आहे. जनतेचा आशीर्वाद, कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि बल्लारपूर मतदारसंघातील विकासाचा झंझावात यालाच विजयाचे श्रेय जाते. बल्लारपूर मतदारसंघातील मतदारांचे मनःपूर्वक आभार, अशी भावना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
============================
‘बल्लारपूर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप-महायुतीचा उमेदवार म्हणून झालेला माझा विजय म्हणजे ईश्वराचा अंश असलेल्या जनतेचा विजय आहे. या विजयाच्या मुळाशी कार्यकर्त्याचे परिश्रम आहेत. बल्लारपूर विधानसभेत भाजपा महायुतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अभूतपूर्व विकास कामांचा हा विजय आहे. हा विजय आपण नम्रतेने स्वीकारत असून पुढील काळात बल्लारपुर मतदारसंघ हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा मतदार संघ म्हणून विकसित करण्याचा संकल्प आहे,’ असा निर्धारही ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
==========================
बल्लारपूर मतदारसंघाची निवडणूक भाजप-महायुतीने विकासाच्या मुद्द्यावर लढवली, असेही ते म्हणाले. ‘आम्ही विकासकामे घेऊन मतदारांपुढे गेलो आणि त्याच मुद्यावर निवडणूक लढवली. विधानसभेतील नागरिकांनी मला मतरुपी आशीर्वाद देत  विकासाच्या बाजूने कौल दिला. मतदारांच्या प्रेमाला आणि विश्वासाला आम्ही कधी उतराई होणार नाही,’ असेही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
==========================
विजय झाला तर माजायचे नाही
‘विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही’ या सूत्रानुसार आम्ही या क्षेत्रात कार्यरत आहोत. बल्लारपूर मतदारसंघातील विकासकामांचा झंझावात यापुढे असाच पुढे नेणार आहे. मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, असा विश्वासही ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===============================
कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here