*भद्रावती तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी आम आदमी पार्टी आक्रमक.*

0
12

=================================

*भद्रावती तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी आम आदमी पार्टी आक्रमक.*

भद्रावती तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाला विविध गावांमधून प्राप्त होत होत्या. या समस्येमुळे ग्रामीण समाजामध्ये अनेक गंभीर परिणाम दिसून येत आहेत, जसे की तरुण पिढी व्यसनाधीन होणे, कौटुंबिक कलह, तसेच सामाजिक अस्थिरता वाढणे.

या पार्श्वभूमीवर, आम आदमी पार्टीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उत्पादन शुल्क कार्यालय, वरोरा येथे निरीक्षक साहेबांना निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

शिष्टमंडळाने प्रशासनाला आवाहन केले की,

1. भद्रावती तालुक्यातील अवैध दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी त्वरित छापे मारावेत.

2. दारू विक्रीच्या बेकायदेशीर अड्ड्यांवर कायमस्वरूपी बंदी आणावी.

3. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विशेष पथक नेमावे.

जर या मागण्या त्वरित पूर्ण केल्या नाहीत, तर आम आदमी पार्टी नागरिकांसोबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या निवेदना वेळी आम आदमी पार्टी युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, युवा शहर अध्यक्ष रोहन गज्जेवार, वरोरा तालुका अध्यक्ष गौरव मेले, ओम पारखी, सुशांत दादा रायपूरे, लक्की निखाडे, राकेश कोवे, सौरव बेताल व इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.      =============================                    *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ===============================                कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here