===============================
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*
*विधानसभेत ‘देवराव पॅटर्न’ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर..*
जिवती, दि. ०१
मागील चार महिन्यांपासून प्रलंबित संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभांश आमदार देवराव भोंगळे यांच्या एका फोनने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्याने जिवती तालुक्यातील लाभार्थ्यांमध्ये ‘देवराव पॅटर्न’ची जोरदार चर्चा रंगली आहे.
जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विधवा तसेच निराधार असलेल्या ०८ हजार लाभार्थ्यांचे मागील चार महिन्यांपासून लाभांश प्रलंबित असल्याने निराधार लाभार्थ्यांना मोठी आर्थिक चणचण निर्माण झाली होती. त्यामुळे हताश लाभार्थ्यांनी वारंवार तहसील कार्यालयात पायपीट केली. आचारसंहिता आणि अन्य कारणांमुळे लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याचे सांगण्यात येत असल्याने लाभार्थ्यांच्या पदरी निराशाच पडत होती.
राजुरा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे हे जिवती तालुक्याच्या दौऱ्यावर असताना पाटण सितागुडा येथे या प्रश्नांसंदर्भात काही नागरीकांनी त्यांना सुतोवाच केलं, तत्क्षणीच त्यांनी तहसीलदार जिवती यांना थेट भ्रमणध्वनी करून संजय गांधी निराध, ============================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================= कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*