==================================
*विंग्स ऑफ होप फाउंडेशन बल्लारपूर द्वारा आयोजित व्यवसायिक परीक्षा संपन्न.*
*बल्लारपूर*
विंग्स ऑफ होप फाउंडेशन महिला व्यवसाय प्रशिक्षण अंतर्गत दिनांक 8-12-24 रविवारला महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय (हिंदी /उर्दू /तेलुगु) बल्लारपूर या ठिकाणी महिलांना व्यवसायिक प्रशिक्षण देण्याकरिता लागणाऱ्या शिक्षीकांसाठी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये टीचर स्टाफ या पोस्टसाठी सुमारे 35 महिला परीक्षेसाठी बसल्या होत्या. या विषयाची सविस्तर माहिती सांगताना विंग्स ऑफ होप फाउंडेशनचे संचालक श्री.शालिक इपकायलवार सरांनी अशी माहिती दिली की, ही संस्था महिलांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन, त्यांच्यामध्ये जे स्किल आहेत तेच काम त्या महिलांना चांगल्या प्रकारे शिकवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देण्याचे काम ही संस्था करते. गरजू महिलांनी याचा फायदा घ्यावा असे जाहीर आवाहन या संस्थेच्या संचालकाने केले आहे. कारण या फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील महिलांना रोजगार प्राप्त होणार आहे. तसेच विंग्स ऑफ होप फाउंडेशन ने 01-12-24 या तारखेला singing ऑडिशन पार पाडले आणि तिथून बऱ्याच महिलांना रोजगार मिळणार आहे. अशी माहिती येथील संचालकाने दिली. या परीक्षेची संपूर्ण जबाबदारी समता लभाने मॅडम यांनी संस्थेच्या अधिकारी या नात्याने उत्कृष्ट रीतीने पार पाडली आणि ऑफिस स्टाफ म्हणून संगीता पडवेकर, नेहा महंतो ,चेताली वनकर, मंगला कुरवटकर, शालिनी मालेकर,पल्लवी गेडाम, यांनी विशेष सहकार्य केले. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*