==================================
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या मंगळवारी विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
गुलदस्ते नको, पुस्तके द्या – भारतीय जनता पक्षाचे आवाहन
*चंद्रपूर*
भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या, मंगळवारी, दिवसभर विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांना शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या शुभेच्छुकांनी गुलदस्त्यांऐवजी पुस्तके देण्याचे आवाहन भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र आणि आमदार किशोर जोरगेवार मित्रपरिवाराच्या वतीने हे आयोजन करण्यात येणार आहे. यात भारतीय जनता पक्ष, बाबुपेठ मंडळ यांच्या वतीने बाबुपेठ येथे लाडू तुला, योग परिवार यांच्या वतीने योग शिबिर, तसेच तुकुम येथे भव्य नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार किशोर जोरगेवार मित्रपरिवाराच्या वतीने शहरातील 21 प्रमुख मंदिरांमध्ये महाआरती आणि महायज्ञ करण्यात येणार आहेत.
याशिवाय, आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात भव्य रक्तदान शिबिर आणि दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध धार्मिक स्थळांना आमदार जोरगेवार भेट देणार आहे. शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या शुभेच्छुकांनी गुलदस्त्यांऐवजी पुस्तके देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भेट स्वरूपातील ही पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत.
तसेच, यावेळी 2025 च्या दिनदर्शिकेचेही विमोचन होणार आहे. एकूणच उद्या, मंगळवारी, दिवसभर सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला जाणार आहे.
==============================
४,५०० विद्यार्थ्यांना होणार २७ हजार नोटबुक चे वाटप
============================== आमदार किशोर जोरगेवार मित्रपरिवाराच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त 4,500 विद्यार्थ्यांना नोटबुक सेटचे वाटप करण्यात येणार आहे. एका विद्यार्थाला सहा असे ४,५०० विद्यार्थांना २७,००० हजार नोटबुक वाटप केले जाणार आहे. बाबुपेठ येथील महापालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळेतील विद्यार्थ्यांना प्रथम नोटबुकचे वाटप करण्यात येईल. हा उपक्रम पुढील सहा दिवस चालणार आहे. ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*