===============================
ब्रम्होत्सव समारोह निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वागत. ===============================
शोभायात्रेत सहभागी भक्तांना शीतपेयाचे वाटप. =============================
*चंद्रपूर*
श्री तिरुपती बालाजी देवस्थानच्या वतीने सातव्ब्रया म्होत्सवाचे तीन दिवसीय आयोजन करण्यात आले होते. या निमित्त आज शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. सदर शोभायात्रेचे भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभेच्या वतीने गांधी चौक येथे स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी भक्तगणांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. श्री तिरुपती बालाजी देवस्थानच्या वतीने बालाजी मंदिर येथे तीन दिवसीय ब्रम्होत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. येथे तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर आज महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमानिमित्त शहरातून शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी गांधी चौक येथे स्वागत मंच उभारण्यात आला होता.
शोभायात्रा स्वागत मंचाजवळ पोहोचताच भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी बालाजी भक्त आणि चंद्रपूरकरांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने शीतपेयाचे वाटप करण्यात आले. ================================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*