===============================
*चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने केली शेतकऱ्यांशी धोकाधाडी,*
*संचालक मंडळ व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा बंडू गौरकार भाजप किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष यांची मागणी,*
शेतकरी वर्गाची बँक म्हणूण ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाद्वारे शेतकऱ्याचे थकीत असलेले पिक कर्ज चालू कर्ज मध्ये दाखऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. ग्रामीण सोसायटी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या द्वारे शेतकरी वर्गाला पिकं कर्जाचे वाटप करण्यात येते आणि सदर कर्जाची परतफेड शेतकरी करत असतात परंतू काही शेतकऱ्यांचे कर्ज हे परतफेड न करु शकल्या मुळे थकित जातात ज्याला NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट्स अंतर्गत मोडल्या जातात असल्या प्रकारात येणारे कर्जाची परतफेड न झाल्यास संचालक मंडळावर गदा येऊन संचालक मंडळ बरखास्त होऊ शकते ह्या भीतीने मागील बारा वर्षा पासून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळावर कब्जा करून बसलेला मंडळाने जुने थकित असलेले कर्ज चालू वित्तीय वर्षा मध्ये दाखऊन शासन आणि शेतकऱ्याशी दगाबाजी चा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जर शासाना मार्फत कर्ज माफी राबवण्यात आली तर थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्याना कर्ज माफीचा लाभ मिळणार नाही. तसेच पुनरगठीत शेतकरी हा प्रोत्साहन भत्या चा लाभ घेऊ शकणार नाही त्यामुळे अतोनात आर्थिक नुकसान होईल ह्याची तमा न बाळगता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने केवळ आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी जिल्हातील हजारों शेतकऱ्यांना धोका दिल्याचा धक्कादायक प्रकार केला आहे.
सदर प्रकरणाची जर सखोल चौकशी केली तर शेतकऱ्याची फसगत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्या शिवाय राहणार नाही.
एकीकडे बँकेच्या कर्मचारी भरती घोटाळ्याची चर्चा सुरू असताना सदरचा प्रकार शासन आणि सर्वसामान्य जनतेचे शोषण करण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाद्वारा करण्यात येतं आहे हे स्पष्ट पने दिसत आहे.
ह्याची सकल चौकशी व्हावी अशी जण सामन्यांची मागणी आसून राज्य शासनाने उचित आदेश देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही मागणी जोर करत आहे आणि सदर प्रकरणाचा योग्य पाठपुरावा करून संचालक मंडळावर गून्हा दाखल करण्यात यावा अन्यथा जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार भरतीत जनता पार्टी किसान मोर्चा द्वारा करण्यात येईल असा इशारा श्री बंडू गौरकार “जिल्हा अध्यक्ष भाजपा किसान मोर्चा तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य,श्री रविभाऊ चहारे जिल्हाध्यक्ष महानगर श्री ओम पवार जिल्हाध्यक्ष भाजपा युवा किसान मोर्चा ह्यांच्या द्वारे देण्यात आला. ह्याचे निवेदन माजी मंत्री तसेच आमदार श्री सुधीर मुनगंटीवार ह्यांचे मार्फत माननिय जिल्हाधिकारी ह्यांना निवेदन देऊन सदर प्रकरणाची चौकशी व्हावी असे निवेदन देण्यात आले आहे, ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे *मुख्य संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356* *उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*