================================
*आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार.*
*चंद्रपूर*
चंद्रपूर (का, प्र, )येथे निर्माणाधीन असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्याल, रुग्णालयाला राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा.सां. कन्नमवार यांचे नाव देण्यात आले आहे. या संदर्भात शासनाच्या वतीने परिपत्रक काढण्यात आले असून, लोकभावना लक्षात घेता महाविद्यालयाला कर्मवीर मा. सां. कन्नमवार यांचे नाव दिल्याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
चंद्रपूरातील सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या महाविद्यालयाच्या शेवटच्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार सातत्याने पाठपुरावा करत आहेत. नुकतीच त्यांनी महाविद्यालयाच्या कामाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, या महाविद्यालयाला माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा.सां. कन्नमवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी समाजबांधवांच्या वतीने करण्यात आली होती. नुकत्याच पार पडलेल्या कर्मवीर मा. सां. कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळ्याला आमदार किशोर जोरगेवार, माजी मंत्री शोभा फडणवीस, आणि आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या आग्रहामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली होती. या महोत्सवात सदर मागणी पुन्हा एकदा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची दखल घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कर्मवीर मा. सां. कन्नमवार यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, “शासकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर” याचे नामकरण “कर्मवीर मा.सा. कन्नमवार शासकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर” असे करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयाबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==============================
हॅलो चांदा न्यूज
मुख्य संपादक
शशी ठक्कर
9881277793
कार्यकारी संपादक, शशिकांत मोकाशे उपसंपादक,विनोद शर्मा,9422168969
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356