*अयोध्येतील राम मंदिराची वर्षपूर्ती,मंदिर निर्माणात चंद्रपूरचे काष्ठ*

0
14

================================

*तमाम जनतेला आठवले सुधीर मुनगंटीवार , ऐतिहासिक सोहळ्यासह केला वर्ल्ड रेकॉर्ड*

*सुधीरभाऊमुळेच ते विहंगम दृष्य आजही आमच्या हृदयात : जिल्ह्यातील रामभक्तांची भावना,*                                      *चंद्रपूर*

चंद्रपूर (का प्र )- २२ जानेवारी २०२४ हा दिवस अयोध्येसाठी तसेच संपूर्ण भारतासाठी ऐतिहासिक ठरला. सुमारे ५०० वर्षांचा प्रभू श्रीरामचंद्रांचा वनवान संपला आणि रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली तो हा दिवस. या ऐतिहासिक सुवर्ण घटनेला वर्षपूर्ण होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त चंद्रपूरकरांचा उर अजूनही भक्तीमय आदर आणि अभिमानाने भरून आला आहे. प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या नेत्रदिपक सोहळ्यात चंद्रपूर शहराला ऐतिहासिक योगदानाची देखील या सोहळ्यानिमित्त वर्षपूर्ती होत आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनंगटीवार यांच्या पुढाकारामुळे प्रभू श्रीराम मंदिरात चंद्रपूरला आपले योगदान देण्याचे भाग्य मिळाले. कारसेवक म्हणून श्रीराम जन्मभूमी आंदोलनात सहभाग नोंदविणारे सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे वन मंत्री म्हणून त्याच श्रीराम जन्मभूमीत साकारलेल्या भव्य राम मंदिरात चंद्रपूरच्या काष्ठाचे योगदान दिले. प्रभू श्रीरामांच्या मंदिरातील गर्भगृहाकरिता देशातील सर्वोत्तम सागवान म्हणून चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या सागवानाची निवड करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सागवान प्रभू श्रीरामांच्या गर्भगृहासाठी वापरले जाणे ही तमाम महाराष्ट्रासाठी आणि चंद्रपूरकरांसाठी अभिमानाची ऐतिहासिक नोंद ठरली.

चंद्रपूर, गडचिरोलीतील सर्वोत्तम सागवान काष्ठ रवाना करण्याचा सोहळा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्येक चंद्रपूरकरांसाठी अविष्मरणीय ठरेल असाच साकारला. त्यांच्या पुढाकारामुळे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोष्याध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून या ऐतिहासिक डोळे दिपवणाऱ्या सोहळ्याचे आणि सुधीरभाऊंच्या रामभक्तीचे तोंडभरुन कौतुक करीत आशीर्वाद दिले होते. या सोहळ्यात अनेक ख्यातनाम कलाकारांनी आपली कला सादर केली. संपूर्ण चंद्रपूर शहरात शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत अनेक कलापथकांनी आपली कला सादर केली. अंत:करणातून प्रभू श्रीरामाशी जुळलेल्या सुधीरभाऊंनी काष्ठ पाठविण्याच्या सोहळ्याला भव्य रुप देऊन श्रीराम मंदिराच्या निर्मितीला एक ऐतिहासिक जोड दिली. १८०० क्यूबिक मीटर सागवान काष्ठ अयोध्येला रवाना करण्यात आले.

प्रभू श्रीरामांचे मंदिर साकारण्याच्या ऐतिहासिक क्षणाला चंद्रपूरकरांनी अनेक अंगांनी ऐतिहासिक करण्यासाठी योगदान दिले. आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची संकल्पना आणि पुढाकारामुळे ३३ हजार २५८ पणत्यांनी ‘सियावर रामचंद्र की जय’ ही अक्षरे साकारण्यात आली. या पणत्या एकाचवेळी प्रज्वलित करुन ‘सियावर रामचंद्र की जय’ या दिपाक्षरांच्या प्रकाशाने चंद्रपुरातील चांदा क्लबच्या मैदानातून जय श्रीरामच्या नामघोषाचा निनाद अयोध्येपर्यंत घुमला. या अनोख्या सोहळ्याने विश्व विक्रम तयार केला.या दिपाक्षरांची नोंद गिनीस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेतली गेली. आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जटायूच्या संवर्धनासाठी घेतलेल्या पुढाकाराने त्यांच्यातील रामभक्तीचे अनोखे दायित्व सिद्ध केले. रामायणात विशेष महत्व लाभलेल्या जटायू अर्थात गिधाडांची झपाट्याने कमी होत चाललेली संख्या ही चिंतेची बाब लक्षात घेऊन श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ताडोबामध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी जटायू संवर्धन केंद्र सुरु करुन श्रीरामचंद्रांना अनोखे वंदन केले.

२२ जानेवारी २०२४ या ऐतिहासिक दिनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. हा सोहळा प्रत्येक भारतीयाप्रमाणेच चंद्रपूरकरांनी देखील डोळ्यात साठवला. पण या सोहळ्यात आपणही ऐतिहासिक योगदान देऊ शकल्याची भावना चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकाच्या मनात होती. आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यामुळेच या ऐतिहासिक सोहळ्यात आपले योगदान देता आले. प्रभू श्रीरामाची सेवा करण्याचे भाग्य या जिल्ह्याला लाभले,अशी भावना चंद्रपूर जिल्हातील रामभक्त आज आवर्जून व्यक्त करीत आहेत.       =============================                  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ==============================               हॅलो चांदा न्यूज मुख्य संपादक,शशी ठक्कर,9881277793

कार्यकारी संपादक, शशिकांत मोकाशे उपसंपादक,विनोद शर्मा,9422168969

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here