मराठी भाषेचे संवर्धन काळाची गरज: प्राचार्य, डाँ प्रमोद काटकर.

0
17

=================================

*सरदार पटेल महाविद्यालयात कवी ज्ञानेश वाकुडकर यांची “सखे साजणी” काव्यमैफिल उत्साहात साजरी,* 

*चंद्रपूर*

चंद्रपुर(का.प्र.): स्थानिक सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे मराठी विभागाद्वारे “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्त ज्येष्ठ कवी ज्ञानेश वाकुडकर यांची ” सखे साजणी” काव्यमैफिल आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. प्रमोद काटकर,कवी ज्ञानेश वाकुडकर, प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार ,मा. मानकर आणि डॉ. पद्मरेखा धनकर मराठी विभागप्रमुख प्रमुख्याने उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात मराठी भाषेचे संवर्धन काळाची गरज असल्याचे प्राचार्य, डाँ प्रमोद काटकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ पद्मरेखा धनकर यांनी केले.या प्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे व विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांचा साहित्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ. पद्मरेखा धनकर यांचा महाविद्यालय व मराठी विभागातर्फे सत्कार करण्यात आला. मराठी भाषा पंधरवड्याचे निमित्त साधून मराठी विभागातर्फे ‘अभिजात मराठी भाषेचा इतिहास’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती.त्यात प्रथम क्रमांक कु.सादिया अली बी.ए. तृतीय व द्वितीय क्रमांक श्रीकांत साव एम.ए.प्रथम आलेल्या या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

“सखे साजणी” कवी ज्ञानेश वाकुडकर यांची काव्यमैफिल त्यांच्या कवितांनी बहरली. प्रेम कविता, सामजिक कविता, चारोळी व रुबाई या काव्य प्रकारांनी काव्यमैफिल रंगवून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाचे प्रा.धनराज मुरकुटे तर आभार प्रा. सोहन कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मराठी विभागाचे प्रा. अनंता मल्लेलवार, प्रा. श्वेता चंदनकर, प्रा. विवेक पवार, प्रा. वैशाली पंडीत यांनी परिश्रम घेतले.महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.          ================================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*       =============================               

हॅलो चांदा न्यूज,मुख्य संपादक,शशी ठक्कर
9881277793
कार्यकारी संपादक, शशिकांत मोकाशे उपसंपादक,विनोद शर्मा,9422168969

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here