===============================
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून घुग्घूस येथे सांस्कृतीक
(का प्र ),आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने उद्या शनिवारी घुग्घूस येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयात उत्सव नारिशक्तीचा या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सैराट फेम अभिनेत्री रिंगु राजगुरु (आर्ची) यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण राहणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने घुग्घूस शहरवासीयांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
घुग्घूस शहरातील महिला कलावंतांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात संध्याकाळी ५ वाजता होणार असून, यात एकल नृत्य, युगल नृत्य आणि समूह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये सुमारे ५० नृत्य गटांनी सहभाग नोंदवला आहे.
या विशेष कार्यक्रमाला अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार असून, महिलांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम म्हणून याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे घुग्घूस शहरवासीयांनी या भव्य आयोजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==============================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356