==================================
संकल्प संस्थेच्या वतीने श्रीमतीचा सौभाग्य सोहळा कार्यक्रमाचे आयोजन
======================
*चंद्रपूर*
चंद्रपूर,(का प्र,),स्त्रीशक्ती ही केवळ कुटुंबाचीच नाही, तर संपूर्ण समाजाची ताकद आहे. जेव्हा एखादी महिला आत्मनिर्भर होते, तेव्हा ती केवळ स्वतःपुरती मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण समाजाला प्रेरणा देते. आज या मंचावर अनेक महिलांनी आपले अनुभव सांगितले. त्यामध्ये संघर्ष होता, कष्ट होते, पण त्याहीपेक्षा जिद्द, आत्मविश्वास आणि काहीतरी करून दाखवण्याची हिम्मत होती. श्रीमतीचा सौभाग्य सोहळा हा याच संघर्षशील प्रवासाची दखल घेत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणारा उपक्रम असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.संकल्प संस्था आणि निमा ह्युमन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा नगर येथे एकल पालकतत्व करणाऱ्या परितक्ता आणि विधवा महिलांच्या संघर्षमय वाटचालीला सन्मान देण्यासाठी “श्रीमतीचा सौभाग्य सोहळा” आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संकल्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक वासलवार, निमा ह्युमन फोरमच्या अध्यक्ष डॉ. शिमला गाजर्लावार, सचिव डॉ. मनीष घुगल, डॉ. वैशाली बदनोरे, डॉ. स्नेहल पोटदुखे, संकल्प संस्थेचे व्यवस्थापक कुंदन खोब्रागडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, समाजामध्ये अनेक महिला वेगवेगळ्या परिस्थितींशी सामना करत आपले जीवन साकारत असतात. काही विधवा होतात, काही परीतक्ता असतात, पण त्यांनी कठीण परिस्थितीसमोर हार न मानता आपल्या कुटुंबासाठी उभे राहणे, ही खऱ्या अर्थाने एक शौर्यगाथा आहे.
आज येथे उपस्थित असलेल्या महिलांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर केवळ स्वतःचे जीवन नव्हे, तर आपल्या मुलांचे आणि परिवाराचे जीवन घडवले आहे. संकल्प संस्थेने हा उपक्रम राबवून या महिलांना सन्मानित करण्याचे मोठे कार्य केले आहे. या गौरवामुळे त्यांना अधिक आत्मविश्वास मिळेल आणि इतर महिलांसाठीही हे एक नवे मार्गदर्शन ठरेल. समाजानेही अशा महिलांच्या जिद्दीला आणि कर्तृत्वाला प्रोत्साहन दिले पाहिजे.
स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी, त्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचावा, त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. महिला म्हणजे केवळ कुटुंबाचा आधारस्तंभ नाहीत, तर त्या संपूर्ण समाजाची शक्ती आहेत. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी हे सिद्ध केले आहे. आणि पुढेही करत राहतील,” असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला परीतक्ता आणि विधवा महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================== *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,**कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356