==============================
चंद्रपूर – आरोग्यसेवा हीच ईश्वर सेवा आहे. वेळेवर रुग्णवाहिका मिळाल्याने अनेकांचे जीव वाचवता येतात. याच उदात्त सेवा भावनेने श्री. विराल चीतालिया यांच्याद्वारे रुग्णवाहिका देण्यात आली. दुर्घटना, आजार व आरोग्याच्या बाबतीत अन्य आपात्कालीन स्थितीत रुग्णवाहिका प्रभावी ठरेल, असा विश्वास आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी आ. श्री. मुनगंटीवार सदैव तत्पर असतात. यापूर्वी अनेक वैद्यकीय सेवा उपक्रम राबवून त्यांनी याची प्रचिती दिली आहे, हे विशेष.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून स्व. विनोदजी चीतालिया मुंबई यांच्या स्मृती प्रित्यर्थ भद्राबेन चीतालिया, विराल चितालिया, मिलान चितालिया यांच्या सौजन्यातून मुल जलतरण संघटनेला रुग्णवाहिका प्राप्त झाली. या रुग्णवाहिकेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सोमवारी (ता.१०) मुल येथील रामलीला भवन येथे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी श्री. विरल चीतालीया, अमोल जाधव, नंदकिशोर रणदिवे, संध्याताई गुरनुले, किशोर कापगाते, संजय चिंतावार, प्रवीण मोहुर्ले, अजय गोगुलवार, प्रज्वलंत कडू उपस्थित होते.
चितालिया यांनी मोठ्या मनाने सेवाभावाने २१ लाख ८७ हजार ३६३ रुपयांची रुग्णवाहिका प्रदान केली, असे सांगत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. विराल चितालिया यांचे आभार व्यक्त केले. तसेच त्यांनी जलतरण संघटना उत्तमरित्या रुग्णवाहिकेचे देखरेख करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुलवासीयांनी या रुग्णवाहिकीचे समर्पक उपयोग करीत गोरगरीबांचा जीव वाचविण्यासाठी काम करावे, या कामात सर्व समुदाय एकदिलाने सहकार्य करतील, असाही विश्वास आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य सेवेमध्ये अनेक महत्वाची कार्य केली आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरमध्ये कॅन्सर हॉस्पिटल तयार झाले, नवीन मेडिकल कॉलेज निर्माण झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १३ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती श्री. मुनगंटीवार यांनी केली. त्यांनी आतापर्यंत नऊ रुग्णवाहिका जनतेच्या सेवेकरिता उपलब्ध करुन दिल्या, मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिर घेतली.
आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण केली जात आहेत. विशेष बाब म्हणून त्यांनी सात उपकेंद्र जिल्ह्यात मंजुर केली. यामध्ये मुल तालुक्यातील चितेगाव, पिंपरी दीक्षित, फिस्कुटी, सुशी, तर पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम, फुटाणा व जामतुकूम या गावांमध्ये उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहेत. आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आतापर्यंत नेत्र चिकित्सा शिबिराच्या माध्यमातून ५० हजार रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. ५ हजारांपेक्षा जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ३५ हजारांहून अधिक चष्मे प्रदान करण्यात आले आहेत. ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================== *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356