Home
Home चंद्रपूर भारतीय सैन्याच्या शौर्याला समर्पित तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा – आ....

भारतीय सैन्याच्या शौर्याला समर्पित तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा – आ. किशोर जोरगेवार

0
63

============================

 17 मे ला शहरातुन निघाणार तिरंगा रॅलीनियोजन बैठक संपन्न 

                 चंद्रपूर. 

                    हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर.(का प्र):- आपल्या जवानांनी दाखवलेली धैर्यशीलतारणनीती आणि समर्पण हे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अभिमान निर्माण करणारे आहे. त्यांचे हे योगदान केवळ सीमारेषेवरच नव्हेतर देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी आहे. ऑपरेशन सिंदुर च्या यशानंतर सैन्याच्या पराक्रमाचा गैरव वाढविण्यासाठी आयोजित होत असलेल्या तिंरगा रॅलीत सर्व देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

            ऑपरेशन सिंदूर च्या यशा नंतर भारतीय सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठीसैन्याच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात तिरंगा रॅली काडण्यात येणार आहे. या अंतर्गत चंद्रपूर मतदार संघातही 17 मे ला रॅलीचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी 5 वजता शिवाजी चौकातून सदर रॅली काडण्यात येणार आहे. याची नियोजन बैठक आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेत कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते.     या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे ओबीसी नेते अशोक जीवतोडेभाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुविर अहिर, माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूरतुषार सोमनामदेव डाहुलेमाजी नगर सेवक सुभाष कासगोट्टूवारप्रकाश देवतळेमनोल पालप्रदिप किरमेश्याम कणकमराहुल घोटेकरदेवानंद श्याम बोधे. वाढईपुष्पा उराडेशितल आश्रामकल्पना बबुलकरराजु अडपेवारसविता दंढारेशितल गुरुनुले आदिंची प्रमुख्तेने उपस्थिती होती. 

             यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कीभारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहेज्यामार्फत आपण आपल्या सैन्याच्या पराक्रमाला सलाम करणार आहोत. याच रॅलीचा भाग म्हणून चंद्रपूर मतदार संघातही भव्य तिरंगा रॅली आयोजित करण्यात येणार आहे. सर्वजण एकजुटीने ही रॅली लोकसहभागात पार पाडू. ही केवळ एक मिरवणूक नसूनभारतीय सैनिकांप्रती असलेला आदरएकता आणि राष्ट्रप्रेमाची भावना जनतेसमोर व्यक्त करण्याचे हे एक सशक्त माध्यम आहे. या रॅलीमध्ये तरुण वर्गमहिला मंडळंस्वयंसेवी संस्थाविविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थाशाळा-विद्यापीठांचे विद्यार्थीविविध समाज बांधव यांनी मोठ्या संख्येने सहभागी होणे गरजेचे आहे. या रॅलीत प्रत्येकाच्या हातात तिरंगा आणि मनात मातृभुमीसाठी अभिमान असेल असेही ते यावेळी म्हणाले. या बैठकीत रॅलीचे उत्तम नियोजन करण्यात आले. तसेच आलेल्या सुचना विचारात घेण्यात आल्या. बैठकीला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. =============================                    *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     =============================                   *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                                       *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here