================================
*चंद्रपूर*
==============================
चंद्रपुर(वि.प्र.): चंद्रपुर शहर पोलीस स्टेशन येथे दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी चार वाजता शब ए बरात (बडी रात)निमित्त शांतता समिती सदस्य तथा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व मज्जिद मौलाना, पदाधिकारी तसेच मदरसा व कब्रस्तान कमिटी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शांततेने बैठक संपन्न झाली.हि बैठक चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या माध्यमातून घेण्यात आली.
कायदा व सुव्यवस्था अबाधित होणार नाही याची विशेष दक्षता घेऊन आपण सर्व मिळून हा उत्सव शांततेने पार पाडणारच असा विश्वास चंद्रपूर अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी व्यक्त केला.चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रभावती एकूरके यांनी ही अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.
या बैठकीला चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, प्रवीण उर्फ बाळू खोबरागडे, शहर शांतता समिती सदस्य प्रशांत हजबन, मोरेश्वर खैरे सह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मज्जिद,मदरसा व कब्रस्तान कमिटी चे पदाधिकारी व मौलाना यांना ही या बैठकीत बोलविण्यात आले होते. जामा मस्जिद कमिटी चे सचिव मोहम्मद शफी कुरेशी, गुलशने औलिया मस्जिद चे अध्यक्ष अफजल खान, जामा मस्जिद चे अब्दुल शदीद, शकील रिजवी, मस्जिद ए कुबा चे रमजान खान, मस्जिद ए आला हज़रत चे मिर्ज़ा शकील बेग, महाकाली कॉलरी कब्रस्तान चे बशीर खान, नूरानी मस्जिद चे सय्यद सिराज, या सह अन्य मस्जिद/मदरसा/कब्रस्तान चे मो.साबिर,अमान अहमद,जावेद गफ्फार बेग, शेख महेबूब, मो. फहीम रज़ा,चांद खान, जहांगीर आलम, फैय्याज कुरेशी, विशेष शाखेचे सुजित बंडीवार सह अन्य मान्यवर ही या बैठकीत उपस्थित होते. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356