================================
विद्यार्थ्यांचा,आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार
===================
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज ====================
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून लाठीकाठीचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली. आपल्या युद्धकौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना लाठीकाठी च्या कौशल्याने विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. या सर्व विद्यार्थ्यांचा आमदार किशोर जोरगेवार यांनी ‘अम्माचा टिफिन’ देऊन सत्कार केला.
लुप्त होत चाललेल्या या क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्याचे कार्य भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने केले जात आहे. याच उद्देशाने त्यांनी नेहरू विद्यालय येथे लाठीकाठीचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात प्रशिक्षक मेघा राहुल मुधोळकर यांनी जवळपास ३० युवक-युवतींना प्रशिक्षण दिले. पुढेही हे शिबिर सुरू राहणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.
आज शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार किशोर जोरगेवार कार्यक्रमस्थळी पोहोचताच विद्यार्थ्यांनी लाठीकाठीची प्रात्यक्षिके सादर करीत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. या वेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेली प्रात्यक्षिके शिवकालीन युद्धतंत्राचे उत्कृष्ट दर्शन घडवणारी होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, त्यांचे लढाऊ तंत्र आणि शौर्य नव्या पिढीने आत्मसात करावे, यासाठी या प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मरक्षण कौशल्ये विकसित होणार असून त्यांना आत्मविश्वास मिळेल,”असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.
=============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356