फ्लाइंग क्लबमुळे जिल्ह्यातील तरुणांच्या वैमानिक होण्याच्या स्वप्नांना पंख

0
11

===============================


चंद्रपूरमधील फ्लाईंग क्लबचे माजी नागरी विमान वाहतूक मंत्री खा. राजीव प्रताप रुडी यांच्या हस्ते उद्या उद्घाटन
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नांना यश 

                    चंद्रपूर 
हॅलो चांदा न्युज  

चंद्रपूर,(का प्र ),चंद्रपूर-गडचिरोली या जिल्ह्यांतील तरुणांना वैमानिक होता यावे, यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला होता. विद्यार्थ्यांचे आकाशात उंच झेप घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. याठिकाणी प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी वैमानिक होतील, तेव्हा चंद्रपूर आणि गडचिरोलीचीच मान अभिमानाने उंचावणार आहे, याचा विचार आमदार श्री. मुनगंटीवार यांनी केला होता. उद्या, दि. २० फेब्रुवारी २०२५ ला दूपारी १.०० वाजता चंद्रपूर फ्लाईंग क्लबचे उद्घाटन होत आहे. त्यामुळे आता आ. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश आले आहे.

हा प्रकल्प भविष्यातील वैमानिकांसाठी मोठ्या संधी निर्माण करेल, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. या फ्लाईंग क्लबचे उदघाटन केंद्रिय माजी नागरी विमान वाहतूक मंत्री, खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या हस्ते दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०१ वाजता मोरवा येथे पार पडणार आहे. प्रशिक्षणार्थी विमानाचे उड्डाण करण्यासाठी मोरवा येथील धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी ६३ लक्ष तर संरक्षण भिंतीसाठी ११ कोटी ९३ लक्ष रुपये तातडीने मंजूर करण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या. दिलेल्या सूचना पुर्णत्वास आल्या असून आता विमानतळ परिपूर्ण तयार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील धावपट्टीचे कार्पेटिंग विमानाच्याच गतीने करावे, यात संबंधित यंत्रणेने विशेष लक्ष द्यावे. निवड करताना पहिल्या टप्प्यातील १० प्रशिक्षणार्थ्यांमध्ये मागास प्रवर्गातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा समावेश आवर्जून करावा, अशा सूचनाही आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या.

चंद्रपूरसाठी ऐतिहासिक पाऊल !


आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरचे फ्लाईंग क्लबचे उद्धाटन होत आहे . यामुळे जिल्ह्यातील तरुणांचे वैमानिक होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. आ.मुनगंटीवार यांनी फ्लाईंग क्लबसाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी जनतेकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे.              ===========================    *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*           ===========================         

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here