============================
भद्रावती
हॅलो चांदा न्युज
भद्रावती(वि.प्र.): सामाजिक चळवळीतील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रमुख मार्गदर्शक व प्रणेते डॉ नरेंद्र दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोलकर सामाजिक कार्यकर्ता विदर्भाच्या दौऱ्यावर असून, 21 फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीच्या ऐतिहासिक नगरीत येत असून प्रथमता सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तिराणिक यांच्या निवासी जनसंपर्क कार्यालयात सकाळी दहा वाजता भेट देतील. सकाळी 11 वाजता राजमनी गार्डन व सभागृह रेल्वे स्टेशन रोड गवराळा, ता. भद्रावती जि. चंद्रपूर येथे उपस्थित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेच्या कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांशी सामाजिक चळवळीतील विशेष विषयाच्या संदर्भात संवाद साधतील दुपारी 2.30 वाजता चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपस्थित राहतील.
पत्रकारांसोबत संवाद साधल्यानंतर त्या मुलकडे प्रयाण करून आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीला संबोधित करतील अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एका पत्रकान्वये दिली आहे. ========================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =======================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356