शंकरपट – परंपरा आणि संस्कृती जिवंत ठेवणारी स्पर्धा – आ. किशोर जोरगेवार

0
14

=============================

शेणगाव येथे शंकरपटचे आयोजनविविध जिल्ह्यांतील बैलजोडींनी घेतला सहभाग  =======================                       चंद्रपूर           =====================                      हॅलो चांदा न्युज 

चंद्रपूर, (का प्र ):छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हतेतर ते एक विचार होते. त्यांनी ज्या तत्वांवर हिंदवी स्वराज्याची स्थापना केलीती मूल्ये आजही आपल्याला प्रेरणा देतात. त्यांच्या दूरदृष्टीत कृषी आणि पशुधन यांचे महत्त्व मोठे होते. आज येथे होणारी बैलजोडी शर्यत ही आपली परंपरा आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य करत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शेणगाव येथे तीन दिवसीय भव्य बैलजोडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. यावेळी प्रभाकर धांडेढोके गुरुजीमंगेश चटकीविजय बावणेविजू मत्तेदीपक खारकरमहेश जेणेकर आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कीमागील पाच वर्षांत विविध विकासकामे करता आली. शहरी भागाचा विकास करत असताना ग्रामीण भागाच्या सर्वसमावेशक विकासावरही विशेष भर दिला. शेणगाव येथेही मोठा निधी दिला आहे. पुढेही या भागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. विकासकामे करत असताना धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रातही मोठे काम सुरू आहे. चंद्रपूरच्या माता महाकालीचा प्राचीन इतिहास देशभर पोहोचविण्यासाठी महाकाली महोत्सवाला सुरुवात केली आहे. तसेच श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून राज्य पातळीवरील विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

बैल हा आपल्या शेतीचा खरा साथीदार आहे. शेतीच्या कामात बैलांची भूमिका महत्त्वाची आहे आणि अशा स्पर्धांमुळे बैलपालनाची परंपरा अधिक जोमाने टिकून राहते. या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळतेत्यांच्या कष्टांना सन्मान मिळतो आणि आपली पारंपरिक कृषी संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते. आयोजकांनी या स्पर्धेसाठी विविध गटांसाठी आकर्षक बक्षिसे जाहीर करून शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य तो सन्मान दिला आहे. विशेष पारितोषिक विजेत्यांचा सन्मान करून त्यांनी ही परंपरा अधिक भक्कम केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी स्पर्धा पाहण्यासाठी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.             =============================           *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*            ==========================               

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here