===============================
कोरपना
हॅलो चांदा न्युज
कोरपना(ता.प्र.): कोरपना तालुक्यातील कोडशी येथील प्रतिष्ठित शेतकरी तसेच कोडशी सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष रामचंद्र पाटील जरीले यांचे दुखद निधन यांचे 21 फेब्रुवारी रोजी रात्री 8.15 झाले.
त्यांची अंत्यसंस्कार विधी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी कोडशी येथील नदीच्या काठावर दुपारी 1 वाजता दरम्यान करण्यात आली.
तदनंतर शोक सभा घेऊन सर्वप्रथम त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व साप्ताहिक कलम मागे इन्साफ चे संपादक सय्यद रमजान अली यांनी रामचंद्र पाटील जरीले यांच्या जीवनावर प्रकाश टाकीत आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.
त्यांच्या अंत्ययात्रेत फार मोठ्या प्रमाणात कोरपना तालुक्यातील नागरिक हजर होते.
कोरपना तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष उत्तम नानाजी पेचे, कोडशी चे माजी उपसरपंच किसन पाटील ताजने, कोडशी चे माजी सरपंच विठ्ठल पाटील टोंगे, भाऊराव पाटील बोरडे, कोडशी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष रमेश बोरडे, योगेश्वर बोरडे, भिवसन जरीले, मोहितकर सर, कवडू जगनाडे, सुभाष तुरानकर, कवडू बोरडे सह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहत त्यांना अखेरचे निरोप दिले. =========================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ========================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356