===============================
कोरपना
हॅलो चांदा न्युज
कोरपना(ता.प्र.): चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील नांदा फाटा येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन विद्यार्थ्यांना,महिलाना सहायक ठरतील अशा अनेक विषयावर मार्गदर्शन करीत साजरा करण्यात आला.
येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा कार्यक्रम राबविण्यात आला. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पाहुणे म्हणून शशिकांत मोकाशे, बाल संरक्षण कक्षाच्या प्रतिभाताई मडावी, तालुका आरोग्य यंत्रणेकडून नांदा प्रभाग परिवेक्षक शेख, यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापिका, प्राचार्य अलेक्झांडरीना डिसूजा, यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे उपमुख्याध्यापक रत्नाकर चटप, तीनशे विद्यार्थी, शिक्षक वृंद,सह कर्मचारी वृंद, ही प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम मान्यवरांचा हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. तदनंतर स्मृतीचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक चटप यांनी केले.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मोकाशे यांनी खेळीमेळीच्या वातावरणात बालकांचे कायदे व बालकांच्या विविध योजना, गुड टच बॅड टच, बालकांसाठी उपलब्ध असणाऱ्या यंत्रणा शासन स्तरावर बहाल केलेले टोल फ्री नंबर्स, महिला हेल्पलाइन बालकांच्या संरक्षणात कोणकोणत्या प्रकारच्या यंत्रणा कार्यरत असतात काळजी व संरक्षणाचा बालक म्हणजे काय विधी संघर्ष ग्रस्त बालक म्हणजे काय त्यासाठी तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर कशाप्रकारे यंत्रणा कार्यरत असतात सोबतच बालविवाह प्रतिबंधक कायदा त्यातील केलेल्या तरतुदी त्यातील शिक्षा, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा, बालग्राम संरक्षण समिती व त्याचे कार्य इत्यादीवर सखोल मनोरंजनात्मक मार्गदर्शनातून बालकांना प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी बालविवाह वर शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गजानन जगनाडे यांनी तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केदार उरकुडे यांनी केले. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356