===============================
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपुर(का.प्र.): चंद्रपूर व यवतमाळ हे औद्योगीक जिल्हे असून पाहिजे त्या प्रमाणात अद्यापही रेल्वे सेवा योग्य प्रमाणात मिळत नसल्याची खंत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संसदेत शुन्य काळात प्रश्नाद्वारे व्यक्त करीत दोन्ही जिल्ह्यात रेल्वे सेवा मजबुत करण्याची मागणी सभागृहात केली.
चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात अनेक उद्योग असून या ठिकाणी रेल्वे सुविधा अपुऱ्या आहेत. विद्यार्थी, नागरीक व व्यापारी वर्गाला पुणे, मुंबई जाण्याकरीता रेल्वे सुविधा नसल्याच्या अनेक दिवसांपासून तक्रारी तथा निवेदने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कडे प्राप्त झाली होती. त्यासाठी चंद्रपूर व यवतमाळ येथे रेल्वे च्या सुविधांमध्ये वाढ झाली पाहिजे या करीता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी 12 मार्च रोजी संसदेत प्रश्न उपस्थित करुन बल्लारपूर-मुंबई तसेच, बल्लारपूर-पुणे या मार्गावर जलद, अतिजलद किंवा वंदे भारत सारख्या रेल्वे सेवा देण्यात याव्या. त्या सोबतच बल्लारपूर ते नागपूर या मार्गावर डेमु ट्रेन सुरु करण्याची मागणी देखील संसदेत केली. त्यासोबतच, कोरोना कालावधीत बंद झालेल्या रेल्वे सेवा पुर्ववत सुरु करण्याची मागणी देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. या मागण्यांवर रेल्वे मंत्री काय भुमिका घेतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. ========================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =========================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356