विदर्भ किसान मजदूर काँग्रेस तर्फे क्रांतीवीर शहीद बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांना माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात आदरांजली वाहीली.

0
2

==============================

                     चंद्रपूर  

          हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर(का.प्र.):
१८५७ च्या स्वांतत्र्य लढयातील क्रांतीवीर शुर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांची १९२ वी जयंती अतिशय उत्साहाने साजरी केली जात आहे.

या पवित्रदिनी माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात व युवा नेते राहूलबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात दिनांक १२ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यासह चंद्रपूरच्या कारागृह परिसरातील क्रांतीवीर शुर बाबूराव शेडमाके यांच्या हुतात्मा स्मारकाला व प्रतिमेला मालार्पण करूण अभिवादन व आदरांजली वाहिली तसेच सोबतच्या सर्वांनी मालार्पण तथा पुष्पार्पण करूण आंदरांजली वाहिली.
वीर बाबुराव शेडमाके यांचा जन्म १२ मार्च १८३३ रोजी गडचिराली जिल्हयातील अहेरी तालुक्यातील किस्तापूर या गावात झाला. २४ सप्टेंबर १८५७ रोजी आदिवासी तरूणांना एकत्र करून जंगोम दल सैन्य उभे करून ब्रिटीशांविरुध्द सशस्त्र लढा दिला. त्यांच्या नेतृत्वाखालील जंगोम दल ने अनेक ठिकाणी ब्रिटीशांना पराभूत केले. अखेर ब्रिटीश सैनिकानी त्यांना १८ सप्टेंबर १८५८ रोजी पकडले. त्यांच्यावर राज्य बंडखोरी करणारा देशद्रोही असल्याचा आरोप करून चंद्रपूरच्या कारागृहाच्या परिसरात २१ ऑक्टोंबर १८५८ ला पिंपळाच्या झाडावर फाशी देण्यात आली. स्वांतत्र्य लढ्यातील क्रांतीवीर शुर बाबुराव शेडमाके यांचे शौर्य व बलिदान सुर्वणाक्षरांनी लिहण्यासारखे आहे. आज १२ मार्च त्यांच्या जन्मदिनी अशा शुर योध्दांचे प्रेरणा नविन पिढीतील युवकांनी घ्यायला हवी. त्यांच्या जंयतीनिमित्य त्यांच्या महान त्यागाला विनम्र अभिवादन.

या आदरांजली कार्यक्रमाप्रसंगी विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेसचे जिल्हा महासचिव अशोक नागापूरे, शहर अध्यक्ष देवेंद्र बेले, क्रांतीवीर शहिद बाबुराव शेडमाके समितीचे अध्यक्षा सौ. शशिकलाबाई उईके, कोषाध्यक्ष श्री श्याम गेडाम, कामगार युनियनचे श्री चंद्रशेखर पोडे, श्री वसंत मांढरे, विरेंद्र आर्या, अनिल तुंगीडवार, गजानन दिवसे, सुधाकरसिंग गौर, बाबूलाल करूणाकर, पंकज गुप्ता, स्वप्नील तिवारी, हेमंत आक्केवार, रतन शिलावार, अजय महाडोळे, राजू लाहमगे, अनंत हूड, मुर्लीधर चौधरी, सुदर्शन पुल्ली, सुनिल बावणे, विनोद महतो, सुरेश बोडणे, अजय रेड्डी, अनुप संधू, अक्रम शेख, इंद्रजित मिश्रा, श्रीकांत पुप्लवार, महेश ठोंबरे, सुनिल दूधे, अंकुश नारलावार, अन्नू सिंग, सौ. अनिता बोबडे, सौ. मंजुषा कुमार, सौ. सिमा शिडाम, सौ. अर्चना रामटेके, सौ. आरती श्रावणे, सौ. इंदिरा मत्ते, विजय शर्मा, कमलेश मित्लवार व विदर्भ किसान मजदूर कॉग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.    ===============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*      =============================               

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here