सार्वजनिक व पर्यावरणयुक्त सण उत्सव हेच राष्ट्रीय एकोप्याचे संदेश: विजय राठोड.

0
3

=============================

                     चंद्रपूर 

         हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर(वि.प्र.): चंद्रपूर येथील ऊर्जानगर येथे आयोजित कार्यक्रमात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांनी मार्गदर्शन करीत सांगितले की पर्यावरण मानवी जीवनाशी संलग्न असल्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणातच मानवी जीवनाचे रक्षण आहे व पारंपारिक सण साजरे करतांना पर्यावरणाची काळजी घेतली जावी व निसर्गाच्या संसाधनांचा योग्य वापर करून त्याचा नाश न करता समाजात ज्या घातक कुप्रव्रृती वाढलेल्या आहेत त्यांचे प्रतिकात्मक दहन करुन पर्यावरण पुरक होळी साजरी करणे व पर्यावरण युक्त सण उत्सव सामूहिकरित्या साजरे करणे हेच राष्ट्रीय एकोप्याचे संदेश आहे व सर्वांनी असेच सर्व राष्ट्रीय सण उत्सव एकत्रित येऊन साजरे केले पाहिजे. ऊर्जानगर येथील खुले रंगमंच मैदानात आयोजित सार्वजनीक पर्यावरणपूरक होळी या कार्यक्रमात त्यांनी यथोचित मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र चे मुख्य अभियंता विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.या कार्यक्रमात उपमुख्य अभियंता श्याम राठोड, डॉ.भुषण शिंदे, नितीन रोकडे, मिलिंद रामटेके तसेच बाहुबली डोडल महाव्यवस्थापक ( विवले), दिलीप वंजारी कल्याण अधिकारी,दुर्गापूर

पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश राऊत, पी .एम. जाधव जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंनिस, मंजुषाताई येरगुडे सरपंच ग्रामपंचायत ऊर्जानगर,यांची प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच रामदास तुमसरे अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ, दुरेंद्र गेडाम अध्यक्ष महा अंनिस ऊर्जानगर , वंश निकोसे युवा सोशल फाउंडेशन, कीसन अळदडे, ऊर्जानगर स्पोटिंग क्लब तसेच सर्वांना खळखळून हसविणारे चंद्रपूरचे कवि नरेश बोरीकर, गोपाळ शिरपुरकर,अरूण घोरपडे, विजय वाटेकर तसेच ऊर्जानगरचे कवी सुरेन्द्र इंगळे, धर्मेंद्र कन्नाके, केशव कुकडे , वैशाली रामटेके यांचीही विचारपीठावर मुख्य उपस्थिती होती.

खुले रंगमंच मैदानात सायंकाळी ६:३० ला गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले त्यानंतर मुख्य अभियंता विजय राठोड
यांच्या हस्ते होळीचे दहन करण्यात आले यात समाजातील कुप्रवृत्तीचे दहन करण्यात आले, त्यानंतर हास्य कवि संमेलन घेऊन सर्वांना मनोरंजनातुन प्रबोधन करण्यात आले तसेच होळीनिमित्त पर्यावरण या विषयावर घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या त्याचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

लहान करू होळी ,दान करू पोळी याप्रमाणे पुरणपोळी, गाठी, व नारळ हे होळीत न टाकता एकत्र जमा करून डेबु व्रृध्दाश्रम देवाळा व अनाथाश्रम वांढरी येथे वितरीत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जूनारे यांनी केले तर प्रास्तावीक दुरेंद्र गेडाम यांनी केले तर आभार देवराव कोंडेकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेकरिता नारायण चव्हाण, नरेंद्र रहाटे, मुरलीधर राठोड, मनीष पाटील, शंकर दरेकर, विजय राठोड, विजय भोयर, हर्षल मेश्राम, इत्यादींनी सहकार्य केले.  ====================        *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*           ===================

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here