==============================
भद्रावती
हॅलो चांदा न्यूज
भद्रावती, (का प्र ):-माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशाने,माननीय आमदार डॉ . मनीषा ताई कायंदे शिवसेना सचिव, माननीय किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ संघटक यांचे सूचनेनुसार, माननीय किशोरजी राय जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात, नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या आदेशानुसार हिंदवी स्वराज्य संस्थापक, आदर्श शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (शिंदे गट) भद्रावतीच्या वतीने अभिवादन करून त्यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मत्ते व शिवसैनिक सुरज भाऊ शाहा उपस्थित होते. तसेच शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या उपक्रमाद्वारे शिवसेना (शिंदे गट) ने महाराजांच्या विचारांना अनुसरून समाजसेवा आणि गरजूंना मदतीचा हात देण्याचा संदेश दिला. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्शांना आपल्या जीवनात अंगीकारण्याचा संकल्प केला. यावेळी शहर प्रमुख पप्पू सारवण, शिवसैनिक सुरज भाऊ शाहा, उपतालुका प्रमुख सुंदर सिंह, शिवसैनिक सुमित हस्तक, उपशहर प्रमुख मनीष बुच्चे, उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम, आकाश वानखेडे, व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ===============================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356