==============================
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर(वि.प्र.)नागपूर येथे काल दिनांक 17 मार्च 2025 रोजी झालेल्या जातीय घटना अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याचे दृष्टिकोनातून आज दिनांक 18 मार्च 2025 रोजी संध्याकाळी सात वाजता बैठकीचे आयोजन
पोलीस ठाणे रामनगर येथे करण्यात आले होते या बैठकीत
सर्व धर्मीय प्रतिष्ठित,मस्जिद कमिटी मुख्य पदाधिकारी,
मौलाना व शांतता समिती सदस्याची प्रामुख्याने उपस्थिती होती.रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा यांच्या नेतृत्वात ही बैठक संपन्न झाली.ही बैठक चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली.
या बैठकीत रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा यांनी सर्व धर्मीय बांधवांना सांगितले की एक जबाबदार नागरिक म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी आपले सहकार्य अतिशय मोलाचे महत्त्वाचे आहे. आपण देखील शांतता कायम राहावी यासाठी विशेष योगदान द्यावे अशी विनंती देखील या बैठकीदरम्यान केली.
या बैठकीत उपस्थित मान्यवरांना रामनगर चे पोलीस निरीक्षक आसिफ राजा यांनी सांगितले की आपण जिल्हा पोलीस प्रशासनास आपले मौलिक सहकार्य करावे कोणतीही अफवा पसरल्यास किंवा सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट आल्यास त्याची माहिती त्वरीत पोलीस स्टेशनला द्यावी.
चंद्रपूर जिल्हा हा शांतता प्रिय जिल्हा असून येथील शांतता कायम राहील असे मला विश्वास आहे व आपण देखील या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित झाला आहात आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून आपण आपल्या जिल्ह्याची शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवू व जातीय सलोखा कायम ठेवू असे देखील या बैठकीत त्यांनी सांगितले.
रामनगर पोलीस स्टेशन येथे संपन्न झालेल्या बैठकीत अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त करीत पोलीस निरीक्षक अशी आसिफ राजा यांना सांगितले की आम्ही सर्व मिळून चंद्रपूर जिल्ह्याची शांतता कायम रहावी यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील राहणार व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा संकल्प देखील याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला.
सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह विधान आल्यास किंवा चित्रफीत आल्यास त्याबाबतची माहिती रामनगर पोलीस स्टेशन अथवा सायबर पोलीस स्टेशनच्या 8888511911 या मोबाईल क्रमांकावर द्यावी असे देखील रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस आसिफ राजा यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा यांनी अतिशय मोलाचे व महत्त्वाचे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांना केले, हे मात्र विशेष !
या बैठकीला चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, जिल्हा शांतता समितीचे सदस्य राजेंद्र सिंह गौतम, जिल्हा शांतता समिती सदस्य बापू अन्सारी, शालिनी भगत, पियुष मेश्राम, रामनगर शांतता समितीचे सदस्य मतीन कुरेशी, ताजुद्दीन शेख, भारती दुदानी, डॉ. इर्शाद अली शिवजी, जनसेवा पार्टीचे प्रदेशाध्यक्ष धीरज शेडमाके, पुरुषोत्तम सहारे, जमाले मुस्तफा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष सैजुद्दीन शेख, मौलाना कदीर अहमद, अब्दुल रब, अक्सा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष एजाज शेख, सय्यद अफसर, मुजीबुल्ला, मदिना मस्जिद कमिटीचे अध्यक्ष बाबू खान, सेक्रेटरी रऊफ शेख, हबीब सय्यद, मुदब्बीर खान, बरकत अली सय्यद, सलीम खा तडवी, मोहम्मद परवेज आलम, मक्का मस्जिद इंदिरा नगर कमेटी चे अध्यक्ष सैयद यूनुस, असलम लतीफ शेख, सैयद अहमद हुसैन,मो. रिजवान शेख, साहब खान, नाजिम शेख, फिरोज खान, रमजान खान पठान, अब्दुल रज़्ज़ाक़, शेख शाकिर, मजीद खान, जावेद साबिर शेख, मोहम्मद हाशम, एजाज खान, शब्बीर अहमद, शाहिद शेख, खुर्शीद शेख विशेष शाखेचे सुभाष शिडाम, दिनेश वाकडे सह अनेक मान्यवर या बैठकीला उपस्थित होते. अतिशय शांततेत शांतता समितीची ही बैठक संपन्न झाली, हे मात्र विशेष! ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356