Home
Home चंद्रपूर वाळू धोरणाअभावी विकासकामे ठप्प – आ. किशोर जोरगेवार

वाळू धोरणाअभावी विकासकामे ठप्प – आ. किशोर जोरगेवार

0
72

===============================

घरकुलांसह रेती उद्योगासाठी स्वतंत्र घाट आरक्षित करण्याची अधिवेशनात मागणी.

                      चंद्रपूर   

             हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर, (का प्र ):- राज्यात अद्याप ठोस वाळू धोरण तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक महत्त्वाची विकासकामे ठप्प झाली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी काही रेती घाट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर वाळूवर आधारित उद्योग आणि घरकुलांच्या बांधकामांसाठी स्वतंत्र घाट आरक्षित करण्यात यावाअशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केली.

मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीवर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यात वाळू धोरण तयार न झाल्याने विकासकामे आणि नागरिकांवर होणाऱ्या परिणामांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यातील अनेक महत्त्वाची सार्वजनिक विकासकामे व घरकुल प्रकल्प रखडले आहेत. रस्तेपूलइमारती यांसारख्या सार्वजनिक बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणावर वाळू आवश्यक असते. मात्रवाळूच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे ही कामे खोळंबली आहेत. परिणामीनागरी सुविधांमध्ये दिरंगाई होत असूननागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हाच मुद्दा आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात उपस्थित केला आहे. यावेळी ते म्हणाले की, वाळू धोरण तयार न झाल्याने रेतीवर आधारित असलेल्या अनेक उद्योगांना देखील मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वीटभट्टी व्यवसायबांधकाम साहित्य पुरवठादारकाँक्रिट मिक्सिंग प्लांटगट्टू कारखाने आणि इतर बांधकाम व्यवसाय वाळूच्या तुटवड्यामुळे अडचणीत आले आहेत. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले शेकडो कामगार बेरोजगार होण्याच्या संकटात आहेत.

घर बांधण्यासाठी वाळू ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मात्रवाळू मिळत नसल्यामुळे अनेक घरकुल प्रकल्प रखडले आहेत. सरकारच्या विविध गृहनिर्माण योजनांमध्ये अर्ज केलेल्या नागरिकांना हक्काच्या घराची प्रतीक्षा अधिक वाढली आहे. त्यामुळे या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले.

सरकारने लवकरात लवकर ठोस वाळू धोरण जाहीर करून या समस्या सोडवाव्यातअशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत केली. यावर उत्तर देताना येत्या आठ दिवसांत वाळू धोरण जाहीर करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.       ========================  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*  =====================         

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here