Home
Home चंद्रपूर श्री महाकाली चैत्र यात्रा उत्सव २०२५ निमित्ताने जिल्हाधिकारी यांनी घेतली आढावा सभा.

श्री महाकाली चैत्र यात्रा उत्सव २०२५ निमित्ताने जिल्हाधिकारी यांनी घेतली आढावा सभा.

0
91

=================================

                      चंद्रपूर

           हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर(वि.प्र.):
दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री महाकाली माता चैत्र नवरात्रोत्सव यात्रा दिनांक ०३ एप्रिल पासून सुरू होत आहे. यात्रेत महाराष्ट्र राज्याचे विषेश करून मराठवाड्यातील व आंध्र प्रदेशातील महाराष्ट्र राज्याचे सीमेलगत असलेल्या गावातील भाविक फार मोठ्या प्रमाणात श्री माता महाकालीच्या दर्शनाकरिता यात्रेत सहभागी होतात.माता महाकालीच्या यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना उपयुक्त सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या जेणेकरून यात्रेकरूंना कुठल्याही प्रकारची अडचण व त्रास होऊ नये असे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी सांगितले ही आढावा सभा चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनाय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली श्री महाकाली देवस्थान मधील स्वर्गीय नामदेवराव सभागृहात दिनांक २२ मार्च २०२५ शनिवार रोजी सायंकाळी साडे पाच वाजता घेण्यात आली.या सभेला चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बिपिन पालीवाल आयुक्त, चंद्रपूरचे उपविभागीय दंडाधिकारी संजय पवार, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, चंद्रपूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे, चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, महाकाली देवस्थान चे व्यवस्थापक सुनील नामदेवराव महाकाले, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी, चंद्रपुर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप कुमार पाटिल, समवेत इतर विभागातील सर्व विभाग प्रमुख ही उपस्थित होते.यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांच्या राहण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आंघोळी करिता स्नानगृह, पार्किंगची व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, व ईतर महत्वाचे विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.सभेनंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर परिसर व परिसरात करण्यात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधा ची पाहणी करण्यात आली नंतर मंदिरा जवळील यात्रा मैदानावर करण्यात येणाऱ्या दर्शन रांग व्यवस्था व तात्पुरती करण्यात येत असलेली मंडप व्यवस्था या भागाची पाहणी करून थेट बैल बाजार मैदानावर करण्यात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांचा आढावा घेतला व उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांचा विभागाशी संबंधित कामांसाठी सुचना देण्यात आल्या.               ============================          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*          =============================                   

*हॅलो चांदा न्यूज,                         मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                        *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here