==============================
चंद्रपूर
हॅलो चंदा न्यूज
चंद्रपूर(वि.प्र.): चंद्रपूर हा शांतताप्रिय जिल्हा आहे. जिल्ह्याचा हा लौकिक कायम ठेवणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आगामी काळात गुढीपाडवा, रमजान ईद, श्रीराम नवमी, महाकाली यात्रा, हनुमान जयंती, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे आदी सण साजरे होणार आहे. हे सर्व सण अतिशय आनंदाने आणि शांततेत साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. तत्पूर्वी चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांचे स्वागत केले.
जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या वतीने जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, सहाय्यक पोलिस अधीक्षक नयोमी साटम, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते.
सण साजरे करताना इतरांना त्रास होऊ नये: जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
सर्वधर्मीय सण साजरे करताना प्रत्येकाने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, प्रत्येकाला आपले धार्मिक सण साजरे करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिला आहे. मात्र सण साजरे करताना इतरांना त्रास होऊ नये, याची काळजी सुद्धा घ्यावी. नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना होणार नाही, यासाठी सर्वांनी सतर्क रहावे. गल्ली, मोहल्ला, सोसायटी येथील सर्वांना शांततेचे महत्व समजून सांगावे. सोशल मीडियाचा वापर हा चांगला आणि वाईटसुद्धा होऊ शकतो. प्रत्येकाने जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करावा. आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा हा कदाचित जिल्हा, राज्य किंवा देशाबाहेरचा सुद्धा राहू शकतो. मात्र अशा पोस्टमुळे आपल्या जिल्ह्यात काही दुष्परिणाम होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. आपापल्या ग्रुपमध्ये सर्वांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. 
जिल्हा प्रशासनाचे नियम पाळा: पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन.
चंद्रपूर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन म्हणाले, चंद्रपूर जिल्हा हा शांततेसाठी ओळखला जातो. सर्वधर्मीय सण साजरे करताना येथील गुन्ह्यांची संख्या नगण्य आहे. नागपूरच्या घटनेवर जिल्हा पोलिस प्रशासन अतिशय अलर्ट असून जागोजागी बैठकांचे सत्र सुरू आहे. आपल्या परिसरात युवकांना सोशल मीडियाचे दुष्परिणाम समजून सांगावे. बऱ्याचशा पालकांना आपली मुलं सोशल मीडियावर काय करतात, याची कल्पना नसते. त्यामुळेच जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने विविध जनजागृती उपक्रम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाचे नियम सर्वांनी पाळावेत व प्रशासनाला सहकार्य करावे. कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले.
महाकाली यात्रेपूर्वी शहरातील रस्ते चांगले होणार: आयुक्त विपिन पालीवाल.
मनपा आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले, सदस्यांच्या सूचनेनुसार सर्वधर्मीय सणांमध्ये पाणीपुरवठा नियमित होणार आहे. रामनवमीच्या दिवशी शहरातील संडे मार्केट बंद राहील. तसेच महाकाली यात्रेपूर्वी शहरातील रस्ते चांगले होणार असून रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
अशा आहेत नागरिकांच्या सूचना:
चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली यांनी सणानिमित्त शहरातील पाणीपुरवठा नियमित व्हावा, सण साजरे करताना इतर धर्मीयांच्या भावना दुखावू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी असे सांगितले, सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, आक्षेपार्ह पोस्टवर नियंत्रण ठेवावे, शहरातील रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करावी, अवैध धंद्यांना आळा घालावा, मिरवणुकीचे आयोजन करणाऱ्या प्रमुख प्रतिनिधींची जिल्हा प्रशासनाने बैठक घ्यावी. यासंबंधीच्या सूचना जिल्हा शांतता समितीचे सदस्य प्रवीण खोब्रागडे, सय्यद मजहर अली, प्रशांत विघ्नेश्वर, इबादुल सिद्दिकी, प्रशांत हजबन, सह अनेक मान्यवरांनी केल्या.
या बैठकीत चंद्रपूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, गडचांदूर नांदा फाटा चे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, राजूरा चे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे, ब्रह्मपुरी चे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, रामनगर पोलीस निरीक्षक आसिफ राजा, बल्लारपूर पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे, चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, राजेंद्र सिंह गौतम, प्रवीण खोबरागडे, सय्यद मजहर अली, प्रशांत विघ्नेश्वर, सुबस्टीयन जॉन, मतीन कुरेशी शालिनी भगत, शांतता समिती सदस्य प्रशांत हजबन, सागर खोबरागडे, दर्शन बुरडकर, छबुताई वैरागडे, भारती दुधानी, धीरज शेडमाके, गुलाबराव पाटील, सलाउद्दीन शेख, महावितरण चे सहा. उप अभियंता घनश्याम सारणे, राजेंद्र आखरे, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन चे उपकार्यकारी अभियंता एन डी वैद्य, ब्रह्मपुरी पोलीस निरीक्षक बानबले, नागभीड पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे, सिंदेवाही पोलीस निरीक्षक विजय राठोड, सावली पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लावार, पोलीस स्टेशन तळोदीचे अधिकारी संगीता बोंडे, पोलीस स्टेशन गडचांदूर अधिकारी जयश्री मडावी, माजरी एपीआय अमित पांडे, योगेंद्रसिंग यादव, पोलीस स्टेशन उमरीचे एपीआय राहुल गुट्टे, लीलाराम राऊत, चंदू मारगोनवार, प्रकाश बगमारे, देवराव मुद्दमवार, प्रकाश गडमवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एस. एस. मिठारी, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे दीपक काळे, एपीआय राजेश गावडे, विरूर चे ठाणेदार संतोष वाकडे, कोठारी ठाणेदार योगेश खरसान, पडोलीचे ठाणेदार योगेश हिवसे, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील डॉ. हेमचंद कन्नाके, नागभीड मुख्याधिकारी राहुल कंकाळ, भद्रावती मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी सह चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावातील पोलीस पाटील बंधू-भगिनी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी केले.
तर आभार प्रदर्शन जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक योगेश पारधी यांनी मानले. बैठकीला उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, पोलिस पाटील, दक्षता समितीचे सदस्य व जिल्हास्तरीय शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. ======================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =====================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356
























