============================
समाजात सुसंवाद आणि शांततेसाठी काम करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. – प्रो. सय्यद सलमान
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर,(का प्र) :- जमात-ए-इस्लामी हिंद, चंद्रपूरच्या वतीने शनिवारी सायंकाळी वरोरा नाका येथील श्रमिक पत्रकार भवन येथे सर्वधर्मीय सदभावना ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा उद्देश सामाजिक एकता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवणे हा होता. 

कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रा. सय्यद सलमान (पुसद) यांनी भूषवले. ते एक तरुण व्याख्याते आणि संत साहित्यातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी रमजान महिन्याचे आध्यात्मिक महत्त्व आणि उपवासाचे सामाजिक धडे अधोरेखित केले.

प्रमुख पाहुणे म्हणून संत मनीष महाराज (श्री स्वामीनारायण मंदिर), फादर प्रकाश भगत, भंते अनिरुद्ध थेरो (महाबोधी बुद्ध विहार), ग्यानी सर्वन सिंग राठोड (गुरुद्वारा गुरु नानक दरबार, तुकुम) उपस्थित होते.
संत मनीष महाराज म्हणाले की, परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात, पण तो एकच आहे. भंते अनिरुद्ध थेरो यांनी बौद्ध आणि इस्लाम धर्माच्या समान शिकवणींवर चर्चा केली आणि सांगितले की धर्म शांती आणि सौहार्दाचा संदेश देतात.
यावेळी खुशाल तेलंग, प्रशांत विघ्नेश्वर, रमजान खान, रमेश हनुमंते, संकल्प शेंडे, अ.रहमान पटेल, नाहिद हुसेन,शंकर पंधारे, हिफजुर रहमान (बाबा भाई) असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात जमात-ए-इस्लामी हिंद, चंद्रपूरचे अध्यक्ष राहिल मिर्झा आणि सचिव फजले वाहिद, सादिक खान आणि त्यांच्या टीमने, विशेषतः तरुणांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या कार्यक्रमाचे संचालन सुफियान खान यांनी केले तर आभार प्रदर्शन वहीद सर यांनी केले. शेवटी सर्वांनी शिरखुर्माचा आस्वाद घेतला. ========================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================== *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

























