================================
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून निशुल्क शिवणकाम शिबिराचे आयोजन, प्रमाणपत्रांचे वितरण
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर.(का प्र) :- निशुल्क शिवणकला शिबिर म्हणजे केवळ शिवणकाम शिकण्याचे साधन नव्हते, तर तो स्वावलंबनाचा एक पहिला टप्पा होता. आपल्या हातात कौशल्य असेल, तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपण स्वतःला सक्षम करू शकतो, आपले कुटुंब सुदृढ करू शकतो. आमच्यासाठी महिला सशक्तीकरण ही केवळ घोषणा नसून ती एक कृती असल्याचे प्रतिपादन आ. किशोर जोरगेवार यांनी केले.आ.किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने नागीनाबाग वार्ड येथे महिलांसाठी निशुल्क शिवणकाम, फॅशन डिजायनींग, ड्रेस कटिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एक महिना चाललेल्या शिबिराचा नुकताच समारोप करण्यात आला असून, यावेळी शिबिरात सहभागी झालेल्या १०० हून अधिक प्रशिक्षणार्थी महिलांना आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध लेखिका व कवयित्री गीता रायपुरे, वंदना हातगावकर, सविता दंढारे, प्रशिक्षिका कौसर खान, आशू फुलझेले, वंदना हजारे, सुरेखा चहारे, स्वाती, पूजा तावडे, राम जंगम, प्रतीक शिवणकर, ताहिर हुसेन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, मागील तीन वर्षांत आपण शिवणकाम, फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर, मेकअप यांसारखी अनेक निशुल्क शिबिरे आयोजित करून हजारो महिलांना प्रशिक्षण दिले आहे. यातील अनेक महिलांनी स्वतःचा रोजगार सुरू केला आहे. आज येथे १०० हून अधिक महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणातून आपण जे काही शिकलात, ते आता प्रत्यक्ष व्यवहारात उतरवा. हे कौशल्य रोजगाराच्या संधी निर्माण करणारे ठरेल.
काही महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील, तर काही जणी घरबसल्या उत्पन्न मिळवू शकतील. यासाठी अधिक मदतीची गरज भासल्यास आमचे कार्यालय सदैव तुमच्या सेवेस तत्पर राहील. शिबिराचे यश केवळ प्रशिक्षण घेतलेल्या महिलांचेच नाही, तर त्या प्रशिक्षणाला दिशा देणाऱ्या प्रशिक्षकांचे, संयोजकांचे आणि संपूर्ण टीमचे असल्याचेही आ.जोरगेवार यांनी यावेळी सांगितले. या समारोपीय कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ======================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ======================== *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356