Home
Home चंद्रपूर 24 मे रोजी एक दिवसीय प्रशिक्षण व महाराष्ट्राचा अभिमान या पुरस्काराचे आयोजन

24 मे रोजी एक दिवसीय प्रशिक्षण व महाराष्ट्राचा अभिमान या पुरस्काराचे आयोजन

0
71

===============================

                       चंद्रपूर 

                 हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर(का.प्र.): येत्या २४ मे ला चंद्रपूर मध्ये प्रशिक्षणार्थ्यांकरिता एक सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. तसेच रोजगार, उद्योग प्रशिक्षण आणि महाराष्ट्राचा अभिमान पुरस्कार २०२५ चे आयोजन ही या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात करण्यात आले आहे. शिका,कमवा व प्रगती करा हा उपक्रम
यहोवा यिरे फाउंडेशन,रेल्वे यात्री एकता मजूर संघ आणि राष्ट्रीय उद्योग भारत तथा पर्यावरण संवर्धन व विकास समीती महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून शनिवार, २४ मे २०२५ रोजी,
सकाळी ९:०० ते सध्या.५:०० पर्यंत
प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह,चंद्रपूर येथे हा एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी विभाग राज्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री डॉ.अशोक उईके यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे तर मुख्य अतिथी म्हणून मराठी अभिनेत्री कु.मयुरी नव्हाते (रांगडा मुवी फेम) तथा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुनिल कुमार मांडवे राष्ट्रीय उद्योग संघटन चे महामंत्री , दिल्ली श्रीमती गिरिजाताई उईके सहाय्यक आयुक्त शिक्षण विभाग नागपुर, कोमलकुमार सुर्यवंशी उपनिरीक्षक पोलिस वाहतुक विभाग चंद्रपूर, सौ.दिप्ती मरकाम पोलिस उपनिरीक्षक चिमूर, शशिकांत अजगरे सचिव राम सामाजिक शैक्षणिक संस्था लातुर डी. के. आरीकर आदिवासी दलित मित्र व पर्यावरण संवर्धन व विकास समीती चे अध्यक्ष नंदगोपाल पांडे अध्यक्ष रेल यात्री एकता मजदूर संघ अकोला, भैय्याजी येरमे सहाय्यक आयुक्त जि. कौ. वि. रो. एव उधो. मार्ग. केंद्र चंद्रपूर, संदिप जाने प्रकल्प अधिकारी म.उ.वि.के.चंद्रपुर,कु.एलिजा बोरकुटे अध्यक्ष यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर, अ‍ॅड. सौ. मनिषा वि. शिंदे विशेष सरकारी वकील अहील्यानगर तथा इत्तर मान्यवर या प्रशिक्षण व पुरस्कार समारंभ मध्ये उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात प्रसिद्ध प्रशिक्षक ही उपस्थिती राहणार आहेत.                                            आपण या व सोबत गरजु विद्यार्थ्यांनी विद्यार्थी ला घेऊन या सर्व प्रशिक्षण निःशुल्क आहे. मग कसली वाट बघता आजच आपले नांव नोंद करा असे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण तथा पुरस्कार चे आयोजन डाॅ. रमेशकुमार बोरकुटे सि.ई.ओ. यहोवा यिरे फाउंडेशन तथा राष्ट्रीय उद्योग भारत दिल्ली कोर कमिटी चे सदस्य व दै. राज आनंद न्युज पेपर पोर्टल चे सह संस्थापक ऑल इंडीया सोशल पत्रकार वेल्फेअर ट्रस्ट चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे बेरोज़गारी मिटवून रोजगार उपलब्ध करून देणे!

शिका, कमवा आणि प्रगती करा!

अधिक माहितीसाठी संपर्क करा:
९८३४४७९४७३, ९६३७५७८५९१     ===============================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ===============================               *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                                       *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here