================================
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर :- पावसाळा अगदी तोंडावर आला असताना
पुर परिस्थितीचा सामना करण्याकरीता आपत्ती व्यवस्थापन (Disaster Managemant) ला लागणारे साहित्य व मनुष्य बळाची वाढ व उत्तम नियोजन करावे, अशी मागणी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून आहे. 
समोर पावसाळयाचे दिवसात चंद्रपूर जिल्हयाची परिस्थिती बघता शहरातील ईरई नदी, झरपट नदी व वर्धा नदी या नदयांच्या पाण्यामुळे या वर्षी देखील पुर परीस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिवृष्टी झाल्यास चंद्रपुरातील नदीकाठा लगतची वसाहती व सखल भागात पाणी साचून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते त्यामुळे शहरातील नाले आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जागा या मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून योग्यरीत्या पावसाळ्यापूर्वीच स्वच्छ करून त्या पद्धतीने नियोजन करावे अशी चर्चाही यावेळी राहुल पावडे यांनी निवासी जिल्हाधिकारी यांच्याशी केली व तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात असा आग्रह केला. या वर्षीसुध्दा पाऊस जास्त येण्याचे अनुमान आहे. त्यामुळे पावसाळ्या आधी सर्व सोयीयुक्त साहीत्य आपत्ती व्यवस्थापन पथकाकडे उपलब्ध होणे गारजेचे आहे. त्याचप्रमाणे स्वयं सेवकाची यादी बनवुन त्याची मदत पुर पिडीत अपातकालीन परिस्थितीमध्ये सुध्दा घेण्यात येऊ शकते. करीता पावसाळा पुर्व नियोजन म्हणुन शहरातील नागरीकांच्या मदती करीता सर्व सोयीयुक्त साहित्य (बोट/नाव) सुसज्ज करून आवश्यक त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावे, करीता भाजपा तर्फे निवेदन राहुल बा. पावडे जिल्हाध्यक्ष भाजपा महनगर, चंद्रपूर यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आले. 
यावेळी भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्यासह भाजपा नेते रामपाल सिंग, प्रज्वल कडू, सुरज पेदुलवार, सविता कांबळे, संदिप आगलावे, पुरुषोत्तम सहारे, दिनकर सोमलकर, चांद सय्यद, शिला चव्हाण, मायाताई उईके,अजय सरकार, चंद्रकला सोयाय,अशा आबोजवार, जयश्री जुमडे, शितल आत्राम, प्रलय सरकार, रणजीत डवरे, सुनिल डोंगरे प्रमोद शिरसागर, महेश जिटे, मनीषा महातव, संजय निखारे,अमोल मते, यांची प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी यांनी भाजप शिष्टमंडळाला या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन दिले. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

























