=============================
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर.( का प्र ) :- संस्कार भारती चंद्रपूर तर्फे गतवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा बालकांसाठी रेषारंग या चित्रकला विषयक कार्यशाळेचे आयोजन प्रत्येक रविवारी सकाळी 7.30 ते 9.30 वाजता दरम्यान आझाद बगीचा चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.
ही.कार्यशाळा सर्व बालकांसाठी नि: शुल्क आहे. संस्कार भारतीचे चित्रकला विधा प्रमुख व प्रसिद्ध चित्रकला शिक्षक किरण पराते आणि रांगोळी विधा प्रमुख व प्रसिद्ध रांगोळीकार सुहास दुधलकर हे या कार्यशाळेत बालकांना चित्रकलेचे धडे देत आहे. ही कार्यशाळा उन्हाळी सुट्यामध्ये घेण्यात येत आहे. गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षी सुद्धा बालकांचा उदंड प्रतिसाद या कार्यशाळेला लाभत आहे. 
चंद्रपूरातील बालकांनी या रेषारंग कार्यशाळेचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन संस्कार भारती चंद्रपूर तर्फे करण्यात आले आहे. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

























