=================================
स्थानिक दुकानदारांना दिला जात आहे त्रास, मात्र अतिक्रमित स्टॉल धारकांना आशीर्वाद!
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर(वि.प्र.): चंद्रपूर शहर महानगरपालिका पथकाची पक्षपाती कारवाई ने स्थानिक दुकानदारांना फार त्रास सहन करावा लागत असून त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे याचे कारण असे कि काही निवडक दुकानदारांचेच सामान हटवले जात असून
रस्त्यावरील इतर अनधिकृत स्टॉल्सवाल्यांना सुरक्षितता प्रदान केली जात असल्याची ओरड आता कानावर येऊ लागली आहे,
स्थानिक दुकानदारांचे फलक बोर्ड उचलून महानगरपालिकेचे या पथकाने स्वतःची पाठ स्वतःच्या हाताने थोपटवत मोठे विक्रम केले असल्याचे दाखवीत आहे. वास्तविक पाहता चंद्रपूरच्या दोन्ही मुख्य रस्त्यावर रस्त्याच्या कडेला फार मोठ्या प्रमाणात अनाधिकृत स्टाल धारकांनी टपरीवाल्यांनी अतिक्रमण करून ठेवलेला आहे तो अतिक्रमण वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असून रहदारीस सुद्धा अडथळा निर्माण होत आहे मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई का केली जात नाही त्यांच्यावर कारवाई न करण्यामागचे रहस्य काय हा प्रश्न आता चर्चेत येऊ लागला आहे.
दिनांक 21 मे 2025 रोजी
महानगर पालिकेच्या या पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी गांधीचौक ते जेटपूरा गेट दरम्यान फुटपाथवर ठेवलेले दुकानदारांचे बोर्ड व काही सामान हटविण्याची कारवाई केली. परंतु ही कारवाई पक्षपाती व हेतुपुरस्सर करण्यात आली असल्याचे आरोप व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फुटपाथवरील सर्वच दुकानदारांचे सामान हटविले गेले नाही, केवळ काही निवडक दुकानदारांचेच बोर्ड व वस्तू उचलण्यात आल्या. त्यामुळे या निवडक पक्षपाती कारवाई मुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी महानगर पालिकेच्या निष्क्रियतेवर सवाल उपस्थित केला आहे, हे मात्र विशेष!
विशेष म्हणजे, रस्त्यावरच चपला-जोडे विकणारे, उसाचा रस, नारळपाणी, कपड्यांचे स्टॉल्स आणि गुपचूप विक्रेते हे मोकळेपणाने व्यवसाय करत असताना त्यांच्यावर कारवाई का टाळण्यात येते . यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत नाही का अशा या स्टाल लावण्यासाठी अतिक्रमण करणाऱ्यांवर दुर्लक्ष करून, नियमित दुकानांच्या बाहेर ठेवलेल्या फलकांवर कारवाई का करण्यात आली? असा प्रश्न व्यापारीवर्गांनी केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील बॅग हाऊसच्या व्यापाऱ्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला असून, महापालिकेने सर्वांवर समान नियम लावावेत, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. व्यापाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हा प्रकार अन्यायकारक असून आम्ही याचा तीव्र निषेध.करतो.”
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या पथकाने पक्षपाती कारवाई करण्याची भूमिका अमलात आणू नये अन्यथा वरिष्ठाकडे दाद मागून कारवाईची मागणी करणार असे देखील व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले आहे, हे मात्रविशेष! 

============================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

























