Home
Home चंद्रपूर चांदाफोर्ट स्थानकाचा ऐतिहासिक कायापालट हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा परिणाम –...

चांदाफोर्ट स्थानकाचा ऐतिहासिक कायापालट हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा परिणाम – आ. किशोर जोरगेवार

0
64

===============================    पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चांदा फोर्ट रेल्वे स्थानकाचे उद्घाटन

                                चंद्रपूर

                        हॅलो चांदा न्युज         

 चंद्रपूर.(का प्र) :-  चांदाफोर्ट स्थानकाचा झालेला कायापालट हा केवळ भौतिक स्वरूपातील बदल नाहीतर तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे मूर्तस्वरूप आहे. त्यांच्या संकल्पशक्तीमुळे आणि केंद्र शासनाच्या सहकार्यामुळेच आज चंद्रपूरकरांना स्वच्छसुसज्ज आणि आधुनिक रेल्वे स्थानक अनुभवता येत आहे. चांदाफोर्ट स्थानकाचा ऐतिहासिक कायापालट हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.            अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत चांदाफोर्ट रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकरस्वातंत्र्यसैनिक डॉ. शेषरावजी इंगोलेमुख्य अभियंता बी.व्ही.एस. सुब्रमण्यमदामोदर मंत्रीपूनम तिवारीप्रकाश देवतळेसुभाष कासनगोट्टुवारविठ्ठल डुकरेरवी गुरनुलेदेवानंद वाढईमधुसूदन रुगंठाप्रदीत किरमेवंदना हातगावकरमधुकर राहूतसुदामा यादवविश्वजित शाहानकुल वासमवारविनोद अनंतवारकार्तिक बोरेवारराहुल मोहुर्लेशेखर शेट्टीसलीम शेख आदींची उपस्थिती होती.          यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कीपंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात अमृत भारत स्टेशन योजना” अंतर्गत देशातील १०३ नव्याने पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण झालेही आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. चांदाफोर्ट स्थानकाचे या यादीत समावेश होणे हे आपल्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे. चांदा फोर्ट स्थानक हे केवळ एक स्थानक नसूनहे या परिसराचा सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार ठरेल. या स्थानकामुळे स्थानिक नागरिकांना आधुनिकस्वच्छसुरक्षित आणि सुसज्ज सेवा मिळतील. आता हे स्थानक अधिक सुरक्षित आणि सुसज्ज सुविधांनी युक्त असेल. स्थानकातील प्रवाशांसाठी नवीन सुविधाव्हीलचेअर ॲक्सेससुसज्ज प्रतीक्षा कक्षडिजिटल सिस्टीम्सएलईडी डिस्प्लेआधुनिक तिकीट व्यवस्थास्वच्छतागृहेआणि व्यावसायिक गरजांसाठी सुलभ मालवाहतूक व्यवस्थापन – या सर्व सुविधा मिळणार आहेत.

केंद्र शासनाच्या सहकार्यानेरेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून हे शक्य झाले. स्थानकासह रस्तेवीजपाणीशिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी अधिकाधिक योजना राबवण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच या परिसरातील रस्तेवीजपाणीआरोग्यशिक्षणआणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.    ==============================                  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   =============================                   *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                         *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here