पावसाळ्यापूर्वी माजी मालगुजारी तलाव दुरुस्तीची कामे जलदगतीने पूर्ण करा – आ.सुधीर मुनगंटीवार

0
10

=================================

बल्लारपूर मतदारसंघातील विविध तलावांच्या दुरुस्ती कामांना वेग देण्याचे निर्देश.
                               चंद्रपूर 
                       हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर,(का प्र) :-  गतवर्षी अतिवृष्टीमुळे तलाव फुटून बोर्डा व चिचपल्ली गावांमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, अशा आपत्तीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आगामी पावसाळ्यापूर्वी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील माजी मालगुजारी तलावांची दुरुस्ती जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा आ.सुधीर मुनगंटीवार यांनी सिंचाई विभागास दिले.
नियोजन भवन येथे मामा तलाव व लपा तलावासंदर्भातील आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार श्री. मुनगंटीवार बोलत होते.बैठकीस कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभागाचे संदीप खांबाईत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, सुरज पेद्दूलवार आदी उपस्थित होते.
आ.मुनगंटीवार यांनी मतदारसंघातील विविध तलाव दुरुस्ती कामांना गती देण्याचे निर्देश दिले. कसरगट्टा (₹६.२५ लाख), बोर्डा बोरकर (₹६.३० लाख) आणि चेक आंबेधानोरा (₹१० लाख) या दुरुस्ती कामांना मंजुरी देण्यात आली असून, तिन्ही कामांसाठी तीन दिवसांची निविदा प्रक्रिया राबवून तात्काळ कामे सुरू करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.मागील वर्षी बोर्डा व चिचपल्ली येथे तलाव फुटून पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे यंदा विशेष दक्षता घेण्यावर भर देण्यात येणार आहे.
दाबगाव मक्ता व आलेवाही येथील मामा तलावांच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक तत्काळ तयार करावे. तसेच दाबगाव तुकूम, आलेवाही नवरगाव (सर्वे नं. १०), कांतापेठ रयतवारी (सर्वे नं. ३५), चिचपल्ली, मुरमाडी (सर्वे नं. ३१), विहीरगाव येथील मामा तलावांच्या दुरुस्ती कामांसाठी कार्यादेश आधीच जारी करण्यात आले आहेत.काही कामांना सोमवारपासून कार्यारंभ आदेश देण्याचे सुचविण्यात आले आहे.मामला तलाव गेट दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे.सर्व उर्वरित कामांना २७ मे पर्यंत मंजुरी मिळवण्याचे निर्देश आ.मुनगंटीवार यांनी दिले.
विभागाने बल्लारपूर मतदारसंघातील सर्व तलावांची यादी तयार करून, त्यांच्या सिंचन क्षमतेसह दुरुस्तीची गरज, खोलीकरण इत्यादी बाबींचे सविस्तर निरीक्षण करून संबंधित विभागाचे रीमार्क्स घावेत. प्रत्येक तलावाची एकत्रित सिंचन क्षमता व खर्चाचे अंदाजपत्रकाची माहिती सादर करावी.चिचाळा–कवडपेठ दरम्यान नव्याने बांधलेल्या तलावाच्या वेस्ट वेअरची उंची जास्त असल्यामुळे यासंबंधी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. बोर्डा तलावाचे अंदाजपत्रक सोमवारी तयार होणे अपेक्षित आहे.मोलझरी तलावासाठी यापूर्वी ₹३ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. उर्वरित कामांसाठी लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.     ===============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    
==============================

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here