राज्यसभा सदस्य इमरान प्रतापगढी यांचा 25,26 मे दोन दिवसीय दौरा.

0
2

===============================

                               दिल्ली

                           हॅलो चांदा न्युज

दिल्ली(वि.प्र.): राज्यसभा सदस्य व अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इमरान प्रतापगढी यांचा 25,26 मे दोन दिवसीय दौरा दिल्ली ते नागपूर, यवतमाळ,अकोला परत नागपूर ते दिल्ली असा असणार आहे.

या दोन दिवसीय दौऱ्यात राज्यसभा सदस्य इमरान प्रतापगढी दिनांक २५ मे, २०२५ रोजी
सकाळी ०६:५० वाजता नवी दिल्ली, इंदिरा गांधी विमानतळ, टी-१डी
इंडिगो विमानाने (६ई-६७०८) प्रस्थान करणार असून त्यांचे
आगमन सकाळी ०८:३५ वाजता
नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विमानतळ, एमएच येथे होणार आहे.

सकाळी 11 वाजता रस्त्याने(By Road) नागपूर वरून ते यवतमाळ कडे प्रस्थान करणार असून दुपारी 2 वाजता यवतमाळ येथे
त्यांचे आगमन होणार असून
ते यू.पी.एस.सी. नागरी सेवा परीक्षेसाठी निवड झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या मुस्लिम महिला म्हणून इतिहास घडवणाऱ्या आदिबा अनाम यांच्या पालकांना आणि कुटुंबातील सदस्यांना भेटणार आहे.

दुपारी 4.30 वाजता इमरान प्रतापगढी हे यवतमाळ वरून रस्त्याने अकोलाकडे प्रस्थान करणार असून संध्याकाळी 7.30 वाजता त्यांचे
अकोला येथे आगमन होणार आहे.

अकोला येथे आगमनानंतर ते विधानसभेचे सदस्य साजिद पठाण यांच्या मुलीच्या लग्न समारंभाला उपस्थित राहणार आहे. तदनंतर रात्री 10 वाजता अकोला येथून रस्त्याने नागपूर कडे प्रस्थान करणार आहे. व रात्रीला 1 वाजता
नागपूर येथे आगमन व
नागपूर येथे रात्रीचा मुक्काम.

दिनांक 26 मे, 2025 रोजी 11 वाजता इमरान प्रतापगढी हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित नागपूर येथे अमरावती आणि नागपूर विभागांसाठी अल्पसंख्याक विभागाच्या आढावा बैठकीला संबोधन व मार्गदर्शन करणार आहे.

26 मे 2025 चे दुपारी 3 वाजता ते
नागपूर येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठकीला संबोधित करीत चर्चा देखील करणार आहे.

संध्याकाळी 6.45 वाजता नागपूर, विमानतळ
इंडिगो विमानाने (६E-२२१३) प्रस्थान करणार असून रात्री 8.30
वाजता त्यांचे नवी दिल्ली, आयजीआय विमानतळ, टी-आयडी येथे 8.30 वाजता आगमन होणार आहे.
अशी माहिती राज्यसभा सदस्य इमरान प्रतापगढी चे खाजगी सचिव अर्शद खान यांनी दिली आहे.    

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here