Home
Home चंद्रपूर यशवंत व्हा, किर्तीवंत व्हा! – डॉ. मंगेश गुलवाडे यांचा शाळा प्रवेशोत्सव च्या...

यशवंत व्हा, किर्तीवंत व्हा! – डॉ. मंगेश गुलवाडे यांचा शाळा प्रवेशोत्सव च्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शुभ संदेश.

0
93

                             चंद्रपूर

                       हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर.(का प्र) :- नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची सुरुवात करताना चिल्ड्रन्स अकॅडमी, चंद्रपूर या नामांकित शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी डॉ. मंगेश गुलवाडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या.

“यशवंत व्हा, किर्तीवंत व्हा!” या शब्दांत डॉ. गुलवाडे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून आपला शुभ संदेश दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासातच नव्हे, तर चारित्र्य, संस्कार व सामाजिक जाणीव यामध्येही उजवा ठरण्याचा सल्ला दिला.

या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे संचालक श्री. प्रशांत हजबन यांच्या कुशल नेतृत्वाखाली करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका अक्षता मोगरे (हजबन)भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर भारतीय जनता युवा मोर्चा ग्रामीणचे महामंत्री यश बांगडे भारतीय जनता युवा मोर्चा महानगराचे महामंत्री गणेश रामगुंडेवार,पराग मलोडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती
शाळेच्या सर्व शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शाळेने आजवर अनेक शैक्षणिक व उपक्रमशील क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही नवचैतन्य, नवे संकल्प व नवीन उद्दिष्टांसह होत आहे.

चिल्ड्रन्स अकॅडमी चंद्रपूर ही शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असून, भविष्यातील यशस्वी पिढी घडवण्याचा निर्धार पुन्हा एकदा या प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here