Home
Home चंद्रपूर आणीबाणीत लोकशाही रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न.

आणीबाणीत लोकशाही रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न.

0
86

आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन.

चंद्रपूर

हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर.(का प्र) :- भारतीय जनता पक्ष चंद्रपूर महानगरच्या वतीने २५ जून रोजी आणीबाणी जाहीर होऊन ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणीबाणी काळा दिवस’ पाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिरआमदार किशोर जोरगेवारभाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारतुषार सोममाजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूरमाजी नगर सेवक देवानंद वाढईप्रदीप किरमेअरुन तिखेदिवाकर पूट्टडवारअजय जयस्वालप्रविण गिलबीलेमाजी नगरसेविका छबु वैरागडेपूष्पा उराडेशितल आश्रामश्याम कनकमनामदेव डाहूलेजितेश कुळमेथेआशिष मासिरकरवंदना हातगावकरसविता दंढारेसायली येरणेमुग्दा खाडे, आशा देशमुख आदिंची प्रामुखतेने उपस्थिती होती

कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आणीबाणीच्या काळात देशासाठी आणि लोकशाहीसाठी संघर्ष करून तुरुंगवास भोगलेल्या गिरिश अणेहेमंत डाहाकसुधीर टिकेकरनारायण पिंपळापुरेअनिल अंदनकरकृष्णा देशपांडेशिल्पा देशकर यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक करणाऱ्या नागरिकांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या सन्मान समारंभाच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेले संघर्षशील दिवस आणि त्यातून मिळालेली शिकवण यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

यावेळी बोलताना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर म्हणालेआणीबाणीचा काळ हा देशाच्या इतिहासातील अंधारलेला अध्याय होता. त्या काळात अनेकांनी जीव धोक्यात घालून सत्याची बाजू घेतली. आज आपण त्यांना स्मरण करतो आहोत आणि त्यांचं योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवत आहोतही अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे. भारताची लोकशाही मजबूत राहिलीयाचं श्रेय अशाच संघर्षशील नागरिकांना जातं. आपण सर्वांनी मिळून ही लोकशाही अधिक सशक्त आणि जबाबदार बनवायला हवी. भारतीय जनता पक्ष लोकशाहीच्या मूल्यांवर चालतो, असे ते म्हणाले.

तर यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणालेआपण आज ज्या स्वातंत्र्याने बोलतोवावरतोमतदान करतोते सहजसाध्य नाही. यामागे तत्कालीन आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी झगडलेले अनेक योद्धे आहेत. त्यांनी तुरुंगवास पत्करलानोकऱ्या गमावल्यापण संविधान आणि नागरिकांच्या हक्कांपासून तडजोड केली नाही. आज त्यांचा सन्मान करून आपण लोकशाहीच्या मूळ मूल्यांना अभिवादन करत आहोत. ही लोकशाही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि ती जपणं हे आपलं कर्तव्य आहे असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here