Home
Home चंद्रपूर आगामी मोहरम, आषाढी एकादशी गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त बैठक संपन्न!

आगामी मोहरम, आषाढी एकादशी गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त बैठक संपन्न!

0
86

                            चंद्रपूर

                      हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर(वि.प्र.): पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे दिनांक २६:०६:२०२५ रोजी सायंकाळी १७:०० आगामी मोहरम, आषाढ एकादशी व गुरुपौर्णिमा सण उत्सव निमित्त बैठक चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.कारागृहामधील बंदोबस्त बाबत आढावा घेण्याकरिता प्रभारी कारागृह अधीक्षक सोनवणे तसेच वरिष्ठ तुरुंग अधिकारी कमलाकर मिरासे प्रामुख्याने उपस्थित होते.या बैठकीत मोहरम सणानिमित्त करण्यात येणाऱ्या उपायोजना व कायदा सुव्यवस्था याबाबत माहिती देण्यात आली तसेच मोहरम निमित्त उपस्थित लोकांकडून त्यांच्या अडचणी तसेच त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपायोजना याच्याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.सदर बैठकीमध्ये शांतता कमिटीचे सदस्य, सवारी काढणारे आयोजक/ संयोजक/ पदाधिकारी/ तसेच सवारी रॅलीमध्ये सहभागी होणारे लोक उपस्थित होते. ग्रामीण भागातील पोलीस पाटील ही उपस्थित होते.या बैठकीत चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, सदानंद खत्री, बाळू खोब्रागडे इत्यादी मान्यवरांनी अनेक सूचना करीत दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही आपण आगामी सण उत्सव आनंदाने, शांततेने साजरे करू अशी ग्वाही उपस्थितांकडून दिली.चंद्रपूर कारागृह चे प्रवेशद्वार दिनांक 5 व 6 जुलै रोजी अर्थात मोहरमच्या 9 आणि 10 तारखेला कारागृह स्थित हजरत मखदुम शहाबुद्दीन शाह उर्फ गैबिशाह वली रह. अलैह च्या दरगाह चे दर्शनाकरिता सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत खुले करण्यात येणार आहे. भक्तगणांनी शांततेने दर्शन घ्यावे व जेल प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन या प्रसंगी चंद्रपूर कारागृहाचे प्रभारी अधीक्षक सतीश सोनवणे यांनी केले व होणारे कार्यक्रमाबाबत ही उपस्थितांना माहिती दिली.

पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर चे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी सांगितले की आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचा नावलौकिक कायम रहावा यासाठी आपण सर्व मिळून आगामी सण उत्सव आनंदाने उत्साहाने साजरे करूया! कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा तसेच जातीय सलोखा कायम राहावा याकरिता आपण सहकार्य करावे कार्यक्रमासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या परवानग्या घेऊन सण उत्सव साजरे करावे असे सांगत वरिष्ठाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनाबाबत ही माहिती दिली.

या बैठकीत चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, सदानंद खत्री, बाळू खोब्रागडे, सय्यद मजहर अली, चंद्रपूर शहर शांतता समितीचे सदस्य प्रशांत हजबन, दर्शन बुरडकर, इमरान शेख ताजू , मोरेश्वर खैरे, राजू राठोड, सौरभ ठोंबरे, मंगला आखरे, सह सलीम मामू , बंटी परचाके, श्याम साखरकर, विजय बैरम, किसन क्षीरसागर , संजय टोंगे, दिनेश गुंडेटी, आरिफ शेख, पवन धकाते, प्रणित माऊलीकर, समीर शेख, इंद्रजीत राजपूत, राज दूपारे, राहुल दुपारे, खुशाल धकाते, सचिन वरटकर, दिलीप शिवणकर, सागर निमगडे, नारायण ईदवार, राजू मामीडवार, मयूर सहारे, अक्षय पाचपोर,अनिकेत सहारे,अंकुश सोनकुसरे, नितीन गोवर्धन, दामोदर धामणगे, यश आंबेकर,अंकित भांदककर, सुमित दोहारकर, हबीबुर रहमान, एजाज पठाण, मोहम्मद खान, राशीद हुसेन, मुस्ताक खान, फिरोज खान, हमीद खान पठाण, फारुख कल्लूमिया शेख, सचिन दुधे, इमाम शहा कासम, विशेष शाखेचे सुजित बंडीवार दिपक जुमने सह सवारी व सण उत्सव कार्यक्रम चे आयोजक संयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here