Home
Home Breaking News ट्रक व दुचाकीत भीषण अपघात! ट्रक चालक फरार!  

ट्रक व दुचाकीत भीषण अपघात! ट्रक चालक फरार!  

0
192

                             घुग्घूस

                       हॅलो चांदा न्यूस

घुग्घूस(वि.प्र.): चंद्रपूर जिल्ह्यातील शहरातील बस स्थानक परिसरातील
मुख्य चौकात लॉयड्स मेटल्स कंपनीकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक TG 29 T 2969 ने रात्री 9 : 45 च्या जवळपास दुचाकीने जाणाऱ्या वेकोली कर्मचारी मुंगोली निवासी संजय पाल, उद्धव मोरे, यांच्या दुचाकीला भिषण धडक दिली यात दुचाकी वरील दोन्ही व्यक्ती भीषण रित्या जखमी झाले या अपघातात दोघांचे ही पाय पूर्णतः मोडले असल्याचे बोलले जात असून घटनेची गंभीरता लक्षात घेता अपघातग्रस्त व्यक्तींना उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले होते. ट्रक चालकाने पोलिस स्टेशन ला ट्रक लावला व पोलीस यांच्या ताब्यातुन फरार, झाल्याने जनतेत रोष, निर्माण झाले होते व सर्वांनी लवकरात लवकर या ट्रक चालकाला पकडण्याची मागणी केली तेव्हा पोलिस स्टेशन घुग्गुस येथे गर्दी झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. ट्रक चालकाला लवकरात लवकर पकडण्याची हमी दिल्याने जनता शांत झाली.

असे अपघात या ठिकाणी अनेक वेळा झाले असल्याने संबंधित प्रशासनाने या बाबतीत योग्य ती दखल घेत विशेष उपाय योजना असे अपघात टाळण्यासाठी करावी असे देखील बुद्धिजीवी वर्गांकडून बोलले जात आहे,हे मात्र विशेष!

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                      *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here