Home
Home Breaking News विनित नानाजी तावाडे याच्या विरोधात MPDA Act चे अंतर्गत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी...

विनित नानाजी तावाडे याच्या विरोधात MPDA Act चे अंतर्गत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी काढले स्थानबध्दतेचे आदेश!

0
163

रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील धोकादायक सराईत गुन्हेगार विनित नानाजी तावाडे याचेविरुध्द MPDA Act अन्वये एक वर्षाकरीता स्थानबध्द ची कारवाई!

                    चंद्रपूर

             हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर(विशेष प्रतिनिधी):चंद्रपूर चे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी जिल्हयातील धोकादायक सराईत गुन्हेगार ज्यात चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, खुन, खुनाचा प्रयत्न करणारे, विनापरवाना हत्यार बाळगणारे, दुखापत करणारे, बलात्कार करणारे, जाळपोळ व जिवे मारण्याची धमकी देणारे, अवैध धंदे करणारे विरुध्द MPDA Act अन्वये प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवुन त्याचा नियमित पाठपुरावा करुन अशा प्रकारच्या गुन्हे करणारे धोकादायक इसमास स्थानबध्द करण्याची मोहीमे अंतर्गत पोलीस स्टेशन रामनगर हदीतील अशाच प्रकारचे गुन्हे करणारा आणि सर्व सामान्य जनतेमध्ये दहशत व भितीचे वातावरण निर्माण करुन जनजिवन विस्कळीत करणारा पोलीस स्टेशन रामनगर आणि बल्लारपूर येथे एकुण १५ गुन्हयांची नोंद असलेला सराईत गुन्हेगार व धोकादायक इसम विनित नानाजी तावाडे, वय २८ वर्ष रा. बापट नगर, ओम भवन जवळ, चंद्रपूर याचे विरुध्द चंद्रपूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांनी सदर इसमावर प्रतिबंध व्हावा म्हणुन कलम ३ (१) महाराष्ट्र झोपडपट्टी, हातभट्टीवाले, औषधी विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २००९, २०१५) MPDA Act अन्वये कारवाईचा अहवाल तयार करुन पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठविल्याने स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, यांनी दस्ताऐवजाची पडताळणी करुन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खरसान ठाणेदार पोलीस स्टेशन कोठारी यांचेकडुन स्थानबध्द प्रस्ताव तयार करून सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले. असता आज दिनांक २ ऑगष्ट २०२५ रोजी नमुद इसम नामे विनित नानाजी तावाडे यास MPDA Act चे तरतूदीनपुर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी स्थानबध्द आदेश मंजुर केल्याने सदर इसमा त्वरीत प्रभावाने जिल्हा कारागृह चंद्रपूर येथे दाखल करुन स्थानबध्द करण्यात आलेले आहे.सदरची कारवाई चंद्रपूर चे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक आसिफ राजा शेख, पोलीस स्टेशन रामनगर,अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक आणि गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खरसान, पोलीस स्टेशन कोठारी, पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे, पोलीस हवालदार संजय देशवाले,अरुण खारकर, पोलीस अंमलदार परवेज शेख,अनिल जमकात, महिला पोलीस हवालदार मनिषा मोरे, महिला पोलीस अंमलदार ब्युल्टी साखरे पोलीस स्टेशन रामनगर आणि स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                         *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here