Home Breaking News स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर द्वारे महिले कङून देहव्यापार करवून घेणार्या इसमा विरुद्ध...
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर(वि.प्र.): दिनांक १९ ऑगस्ट, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथक पेट्रोलींग करीत अतसांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे मुक्ती नगर मच्छीनाला चंद्रपूर येथील रहिवासी नामे अमर शशिकांत द्विवेदी वय ३१ वर्ष याचे राहते घरी धाड टाकुन पंचासमक्ष त्याचे राहते घराची पाहणी केली असता तेथे एक महिला मिळून आल्याने तिची विचारपुस केली असता सदर इसमाने स्वतःचे आर्थीक फायदयाकरीता तिचेकडुन देह व्यापार करीत असल्याचे सांगितले वरुन सदर महिलेची सुटका करुन आरोपी नामे अमर शशिकांत द्विवेदी विरुध्द पोलीस स्टेशन रामनगर कलम ३, ४, ५, ७ महिला व मुलींचे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम आणि PITA अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
सदरची कार्यवाही चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात विशेष पोलीस अधिकारी अमोल काचोरे यांचे नेतृत्वात स.पो.नि. बलराम झाडोकार, पो.उप.नि. संतोष निंभोरकर, पो.उप.नि. सर्वेश बेलसरे, स.फौ. धनराज करकाडे, पो.हवा. चेतन गज्जलवार, सुरेंद्र महतो, पो.अं. प्रफुल्ल गारघाटे, सुमित बरडे, शशांक बादामवार, म.पो.अं. छाया निकोडे, अपर्णा मानकर, उषा लेडांगे, विजयमाला वाघमारे, निराशा तितरे व चापोअं मिलींद टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*