Home
Home चंद्रपूर डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांच्यावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव!

डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांच्यावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव!

0
104

 

HELLO CHANDA NEWS

     चंद्रपूर(वि. प्र.): डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांच्यावर त्यांच्या चाहत्या वर्गांकडून तसेच बुद्धिजीवी वर्गांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, हे मात्र विशेष.

         डॉ.रमेशकुमार बोरकुटे यांना लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त
इन्स्टिट्यूट फॉर सोशल रीफॉर्म अँड हायर एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट उत्तर प्रदेश (भारत) व इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ रिसर्च अँड डेव्हलपड ऑर्गनायझेशन(IARDO) तर्फे इंडिया इंटरनॅशनल सेंटर दिल्ली येथे “भारत श्री रत्नम सन्मान 2025” या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

        या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे चंद्रपूर जिल्ह्यातील यहोवा यीरे फाऊंडेशन चे संस्थापक डॉ.रमेशकुमार बोरकुटे यांना “भारत श्री रत्नम 2025” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून पायोनियर सी.ई.ओ. एक्सीलेन्स अवॉर्ड ने त्यांना सन्मानित करण्यात आल्याने अनेक स्तरावरून त्यांचे कौतुक केले जात आहे.

         डॉ.रमेशकुमार बोरकुटे यांचे चंद्रपूरला आगमन होताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना “भारत श्री रत्नम 2025” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे स्वागत सत्कार केले.

          साप्ताहिक कलम मांगे इन्साफ चे मुख्य संपादक सय्यद रमजान अली यांनीही यहोवा यीरे फाऊंडेशनच्या चंद्रपूर येथील मुख्य कार्यालयात डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या व पुढील भविष्य उज्ज्वल ठरो अश्या भावना व्यक्त केल्या . या प्रसंगी हॅलो चांदा न्यूज पोर्टल आणि युट्युब चॅनेल चे संपादक शशिकांत ठक्कर यांनी ही डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांचे अभिनंदन केले.

डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांना यापूर्वीही अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून बोरकुटे यांची कार्यप्रणाली वाखाणण्याजोगी आहे. डॉ.रमेशकुमार बोरकुटे यांच्या माध्यमातून रोजगार मिळावे,उद्योग क्षेत्रात युवकांची प्रगती व्हावी या उदात्त हेतूने अनेक कार्यक्रम घेतले जात असल्याने व युवकांच्या भविष्य उज्वल व्हावे या करिता ते नेहमीच प्रयत्नशील राहत असल्याने त्यांनी आपली एक विशेष ओळख निर्माण केली असून सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचें नावलौकिक झाले असल्याने त्यांच्या हितचिंतकांनी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, हे मात्र विशेष!

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here