Home
Home चंद्रपूर युवतींच्या आत्मनिर्भरतेतूनच घडणार सक्षम समाज – आ. किशोर जोरगेवार.

युवतींच्या आत्मनिर्भरतेतूनच घडणार सक्षम समाज – आ. किशोर जोरगेवार.

0
143

भारतीय जनता पक्षाच्या वतीने युवती मेळावा.

HELLO CHANDA NEWS

        चंद्रपूर,(का. प्र.) : आजच्या काळात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे. शिक्षणविज्ञानराजकारणउद्योजकता या सर्व क्षेत्रांत स्त्रिया सक्षमपणे काम करत आहेत. मात्रअजूनही काही ठिकाणी संधी कमी आणि अडथळे जास्त आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. आजची भारतीय स्त्री कुठेच मागे नाही. परंतु केवळ यश मिळवणे पुरेसे नाहीते टिकवण्यासाठी आत्मविश्वासशिक्षण आणि स्वावलंबन आवश्यक आहे. युवतींच्या आत्मनिर्भरतेतूनच सक्षम समाज घडणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

            भारतीय जनता पार्टी युवती आघाडीच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात युवती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारयुवती प्रमुख प्रियंका चिताडेमहामंत्री मनोज पालसविता दंढारेरवि गुरुनुळेग्रामीण तालुका अध्यक्ष विनोद खेवलेमंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरेआशिष देवतळेराकेश पिंपळकरसुमित बेलेसुभाष पिंपळकरसायली येरणे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

           यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कीयुवतींच्या आत्मनिर्भरतेतूनच एक सक्षम समाज उभा राहतो. जेव्हा युवती आर्थिकशैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या सबळ होतेतेव्हा तिचं कुटुंबतिचं गाव आणि अखेर संपूर्ण देश सक्षम बनतो. हा मेळावा केवळ कार्यक्रम नाहीतर स्त्रीशक्तीचा उत्सव आहे. युवतींच्या जिद्दीत जग बदलविण्याची ताकद आहे. मी करू शकते’, ‘मी बदल घडवू शकते’ हा आत्मविश्वास प्रत्येक युवतीच्या मनात जागा व्हावाअसे ते म्हणाले.

          ते पुढे म्हणाले की, ‘लाडकी बहिण योजना’, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘मुद्रा योजना’, ‘महिला उद्योजकता विकास’ अशा योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सन्मान मिळत आहे. तुम्ही या योजनांचा लाभ घ्यास्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि समाजात नवे आदर्श निर्माण कराअसे आवाहन त्यांनी युवतींना केले.

     चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक युवती आत्मनिर्भर व्हावीयासाठी कौशल्य विकास केंद्रेप्रशिक्षण शिबिरे आणि स्वयंरोजगार योजना हाती घेण्यात येणार आहेत. आपण यापूर्वी ब्युटी पार्लरफॅशन डिझायनिंगशिवण क्लास यांसारख्या महागड्या प्रशिक्षणांची मोफत सोय करून दिली आहे. चंद्रपूर मतदारसंघात झालेल्या ७० हून अधिक प्रशिक्षण शिबिरांमधून तीन हजारांहून अधिक महिला आणि युवतींना आपण प्रशिक्षित केले असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन भाग्यश्री हांडे यांनी केले. मेळाव्याला युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here