Home
Home चंद्रपूर मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या उक्ती ला अनुसरून डॉ. राजेश...

मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या उक्ती ला अनुसरून डॉ. राजेश नाईक यांचे 93 वे रक्तदान.

0
170

HELLO CHANDA NEWS

                नागपूर,(वि. प्र.) : “मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे “, या उक्तीला अनुसरून भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलालजी नेहरू आणि क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या जयंतीच्या निमित्ताने (पुर्वसंध्याकाळी) अतीविषेशोपचार रुग्णालय ( सुपर स्पेसिऍलिटी हॉस्पिटल ), नागपूरच्या रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. आफताब बनानी, सहाय्यक प्राध्यापिका डॉ. अंकिता कोल्हे, समाजसेवा अधीक्षक, अजय डोंगरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रुपाली कावळे, स्टाफ नर्स सीता निमरेड, राजू अप्परवार, कार्तिक बंड यांच्यासह इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या विशेषज्ञ समूह समितीचे सदस्य, महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदचे सदस्य, डागा स्मृती शासकिय स्त्री रुग्णालय, गांधीबाग, नागपूरच्या नियामक समिती आणि कार्यकारी समितीमधिल मा. जिल्हाधिकारी महोदयांचे प्रतिनिधी आणि सदस्य, नागपूर शहर केंद्रीय पोलिस शांतता समितीचे सदस्य आणि आखिल भारतिय मराठी नाट्य परीषद, नागपूर शाखेचे कार्यकारीणी सदस्य आणि मयुरेश जिवनविकास परिवार संस्थाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेश नाईक यांनी अती विषेशोपचार ( सुपर स्पेसिऍलिटी हॉस्पिटल ) रुग्णालय, तुकडोजी पुतळा चौक, मानेवाडा रोड, नागपूरच्या रक्तपेढीमध्ये जाऊन आपल्या “93” व्या रक्तदानाची फेरी पूर्ण केली.

                         या निमित्ताने मयुरेश जिवनविकास परिवार संस्थेच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

       या प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते रक्तदाता कार्ड, रक्तदानाचे प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह प्रदान करून प्रा. डॉ. राजेश नाईक यांना उपकृत करण्यात आले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here